मातीशी नाळ जोडून असणाऱ्या प्रविण तरडेंचं घरही त्यांच्या पत्नीने सुंदर पद्धतीने सजवलं आहे.स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो-व्हिडिओमध्ये घराचं आकर्षक इंटेरियर दिसतं. आधुनिकता, साधेपणा आणि पारंपरिक टच यांचा सुंदर संगम त्यांच्या घरात पाहायला मिळतो.

पण यश मिळण्याआधी त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. काही मुलाखतींमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. घर चालवणं कठीण होतं. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली, “यातून काही होणार नाही” असंही ऐकावं लागलं. पण त्यांनी हार मानली नाही. प्रविण तरडे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनेही प्रत्येक संघर्षात खंबीर साथ दिली. कलाकाराच्या आयुष्यातील चढ-उतार सहन करत त्यांनी संसार सांभाळला.
त्यामुळेच आज यश मिळाल्यानंतर प्रविण तरडे पत्नीबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पत्नीला तब्बल सात फ्लॅट्स गिफ्ट केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. संघर्षातून आलेल्या व्यक्तीने इतकं मोठं यश मिळवणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं. मातीशी नाळ जोडून असणाऱ्या प्रविणचे घर देखील त्याच्या पत्नीने असच सजवून ठेवलं आहे. स्नेहल तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या घराचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. पाहूया कसं आहे त्यांचे घर (फोटो सौजन्य :- @snehal.tarde)
घरात पुस्तकांसाठी खास जागा
याशिवाय घरात पुस्तकांसाठी खास जागाही तयार करण्यात आली आहे. प्रविण तरडे यांना वाचनाची विशेष आवड असल्याचं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितलं जातं. घरातील एका कोपऱ्यात मोठं बुकशेल्फ तयार करण्यात आलं असून त्यात साहित्य, नाटकं, चित्रपट, इतिहास आणि अध्यात्माशी संबंधित अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. शांत वातावरणात बसून वाचन करता यावं यासाठी त्या जागेचं इंटेरियरही अतिशय साधं आणि आकर्षक ठेवण्यात आलं आहे.
पुस्तकांच्या या खास कोपऱ्यामुळे घराला एक वेगळी बौद्धिक आणि कलात्मक ओळख मिळते. आधुनिक डिझाईनसोबत ज्ञान आणि संस्कृतीची जपणूक करणारा हा भाग चाहत्यांना विशेष आवडत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या घरातील या पुस्तकांच्या जागेचं कौतुक केलं आहे.
घराच्या बाल्कनीमध्ये चुलीचा सेटअप
या घरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे घराच्या बाल्कनीमध्ये तयार करण्यात आलेला पारंपरिक चुलीचा सेटअप. आजकाल फ्लॅट संस्कृतीमध्ये अशा प्रकारची कल्पना क्वचितच पाहायला मिळते. पण प्रविण तरडे यांनी आधुनिक घरातही ग्रामीण संस्कृतीची आठवण जपण्याचा प्रयत्न केला आहे. बाल्कनीमध्ये तयार केलेली ही चुल पाहताच गावाकडच्या जुन्या आठवणी ताज्या होतात.
ही चुल फक्त सजावटीसाठी नाही, तर पारंपरिक जीवनशैलीशी जोडलेली भावना जपण्यासाठी तयार करण्यात आल्याचं सांगितलं जातं. चुलीजवळ मातीची भांडी, पारंपरिक सजावट आणि ग्रामीण टच देणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराला एक वेगळंच आकर्षण मिळालं आहे. अनेकांनी त्यांच्या घराच्या इंटेरियरचं कौतुक करत “आधुनिकतेसोबत संस्कृती जपणं म्हणजे हेच” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हाईट रंगाच योग्य वापर
प्रविण तरडे यांचं आलिशान घरही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. घराची संपूर्ण व्हाईट थीम अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. भिंतींपासून फर्निचरपर्यंत सर्वत्र पांढऱ्या रंगाचा सुंदर वापर करण्यात आला आहे. घरात साधेपणा, शांतता आणि आधुनिकता यांचं सुंदर मिश्रण पाहायला मिळतं. मोठ्या खिडक्या, नैसर्गिक प्रकाश आणि मिनिमल इंटेरियरमुळे घर अधिक आकर्षक दिसतं.
प्रविण तरडे यांचे घर कसे आहे
लाकडी फर्निचर
घरातील लाकडी फर्निचरही विशेष लक्ष वेधून घेतं. व्हाईट थीमच्या इंटेरियरसोबत लाकडी टेबल, खुर्च्या, शेल्फ आणि सजावटीच्या वस्तूंमुळे घराला उबदार आणि रॉयल लूक मिळाला आहे. नैसर्गिक लाकडाचा वापर केल्यामुळे घरात साधेपणा आणि एलिगन्स यांचं सुंदर संतुलन पाहायला मिळतं.भिंतीलगत तयार केलेले वुडन शेल्फ आणि पारंपरिक डिझाईनच्या खुर्च्या घराच्या सौंदर्यात भर घालतात. विशेष म्हणजे आधुनिक व्हाईट थीममध्ये लाकडी टेक्स्चरमुळे घर अधिक क्लासी आणि आरामदायी वाटतं. घरातील प्रत्येक फर्निचरमध्ये मिनिमल पण स्टायलिश डिझाईन पाहायला मिळतं. त्यामुळे घराला एकाच वेळी मॉडर्न आणि पारंपरिक असा हटके लूक मिळाला आहे.
व्हाईट सोफा आणि खुली बाल्कनी
व्हाईट सोफा आणि खुली बाल्कनी हे प्रविण तरडे यांच्या घराचं खास आकर्षण ठरत आहे. घरातील पांढऱ्या रंगाचा आलिशान सोफा संपूर्ण इंटेरियरला क्लासी आणि शांत लूक देतो. मोठ्या खिडक्या आणि खुल्या बाल्कनीमुळे घरात नैसर्गिक प्रकाश भरपूर येतो, त्यामुळे घर अधिक प्रशस्त आणि पॉझिटिव्ह वाटतं. बाल्कनीमध्ये बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली असून आधुनिक व्हाईट थीम आणि ग्रामीण टच यांचं सुंदर मिश्रण या घराला वेगळी ओळख देतं.
