Ranbir Kapoor Gets Conjunctivitis Infection: 4000 कोटींच्या ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचपूर्वी रणबीर कपूरला गंभीर इन्फेक्शन; मुलगी राहामुळे झालीय लागण; आता तब्येत कशी?


Ranbir Kapoor Gets Conjunctivitis Infection: 4000 कोटींच्या आगामी ‘रामायण’ (Ramayana) सिनेमाची सध्या संपूर्ण देशभरात क्रेझ पाहायला मिळतेय. या सिनेमात बॉलिवूड स्टार (Bollywood Actor) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्री रामांच्या (Lord Shree Ram) भूमिकेत झळकणार आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च (Ramayana Trailer Launch) करण्यात येणार आहे. ‘रामायण’ सिनेमाच्या अधिकृत ट्रेलर लाँचची तयारी जोरात सुरू आहे, पण या भव्य कार्यक्रमाच्या अगदी आधीच रणबीर कपूर प्रकृतीच्या समस्यांना तोंड देतोय. रणबीर कपूरला गंभीर इन्फेक्शन झालं असून त्याची मुलगी राहामुळेच त्याला हे इन्फेक्शन झाल्याची माहिती मिळतेय. 

4000 कोटींच्या ‘रामायण’ सिनेमाचं प्रमोशन दणक्यात सुरू आहे. येत्या काही दिवसांतच सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. पण, त्यापूर्वीच सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता रणबीर कपूर एका गंभीर इन्फेक्शनचा सामना करतोय. रणबीर कपूरच्या डोळ्यांना इन्फेक्शन झालं आहे. येत्या काही दिवसांतच ‘रामायण’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. आता इन्फेक्शनमुळे रणबीर कपूर या इव्हेंटला उपस्थित राहणार की, नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. पण, आता रणबीर कपूरनं यावरही उपाय शोधला असून तो दिल्लीतील इव्हेंटला खबरदारी घेऊन उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.  

मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करुन दिल्लीतील इव्हेंटला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. तो केवळ या भव्य सोहळ्यात, अनेक बड्या कलाकारांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात सहभागीच होणार नाही, तर खबरदारीचा उपाय म्हणून काळा चष्मा (डार्क ग्लासेस) लावून मंचावरही उपस्थित राहणार आहे.

मुलगी राहामुळे रणबीर कपूरला गंभीर इन्फेक्शन (Ranbir Kapoor Gets Conjunctivitis Infection)

अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्रानं ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितलं की, या संसर्गाची लागण सर्वात आधी रणबीर कपूरची मुलगी ‘राहा’ हिला झाली. असं मानलं जातं की, अभिनेत्याला तिच्याकडूनच ‘कंजंक्टिव्हायटिस’ची लागण झालीय. डोळ्यांचा हा संसर्ग, ज्याला सामान्यतः ‘पिंक आय’ (Pink Eye) म्हणून ओळखले जातं, तो निकटच्या संपर्कामुळे वेगानं पसरतो. त्यामुळे अनेकदा कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होते. सिनेमाशी संबंधित एका सूत्रानं सांगितलं की, “रणबीर कपूरला कंजंक्टिव्हायटिसची लागण झालीय. त्याची मुलगी राहा हिला याची लागण आधी झाली होती आणि त्यानंतर आता रणबीरलाही त्याचा संसर्ग झाला…”

अस्वस्थता असूनही, रणबीरनं हा महत्त्वाचा कार्यक्रम न चुकवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्लीतील ‘भारत मंडपम’ इथे होणाऱ्या ‘प्रथम संकल्प’ या मोठ्या कार्यक्रमासाठी ‘रामायण’ची टीम पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे, दिलेलं वचन पाळण्यासाठी ओळखला जाणारा रणबीर खबरदारीचा उपाय म्हणून या कार्यक्रमादरम्यान डार्क ग्लासेस घालून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.”

दिल्लीत भव्य ट्रेलर लॉन्च (Ramayana Trailer Launch Event)

वर्षातील सर्वात मोठ्या सोहळ्यांपैकी एका सोहळ्याच्या अवघ्या काही दिवस आधी ‘रामायण: पार्ट 1’ (Ramayana: Part 1) बाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. मीडिया रिपोर्टनुसार, नितेश तिवारी यांच्या या सिनेमाचा ट्रेलर 18 जुलै रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ इथे प्रदर्शित केला जाणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा पार पडणार असून, यात सिनेमातील अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, रावणाची भूमिका साकारणारा यश आणि भगवान हनुमानाची भूमिका साकारणारा सनी देओल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

केव्हा रिलीज करणार फिल्म? (Ramayana Released Date)

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनात बनणारा सिनेमा दोन पार्ट्समध्ये रिलीज केला जाणार आहे. फिल्मचा पहिला पार्ट दिवाशी 2026 मध्ये थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. यानंतर शेवटचा पार्ट 2027 मध्ये रिलीज केला जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: ‘एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध…’; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं ‘बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *