Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या एका पॉडकास्टमधील (Priyanka Chopra Nick Jonas Podcast) तिच्या उपस्थितीमुळे चर्चेत आहे, ज्यात तिनं तिचा पती निक जोनास (Nick Jonas) आणि जोनास ब्रदर्स यांच्या उपस्थितीत एका बॉलिवूड अभिनेत्याच्या (Bollywood Actor) कथित अफेअर्सबद्दल खळबळजनक खुलासा केलाय. प्रियंकानं त्या अभिनेत्याचं नाव घेतलं नसलं तरी, तो विविध ‘एक्स्ट्रा करिकुलर एक्टिव्हिटीजमध्ये’ गुंतलेला असल्याचं तिनं सांगितलं. खरं तर पॉडकास्टमध्ये जेव्हा निक जोनस म्हणाला की, त्याचं फेवरेट सेलिब्रिटी गॉसिप ते आहे, ज्यात स्टार्सच्या कथित अफेअर्सच्या गोष्टी होतात.
निक जोनास म्हणाला की, “मला ‘एक्स्ट्रा करिकुलर एक्टिव्हिटीज’बद्दलच्या कथा आवडतात, म्हणजे नात्यांशी संबंधित गोष्टी असतात” ने कोणाचेही नाव न घेता नात्यांभोवतीच्या अफवांचा उल्लेख केला. ‘देसी गर्ल’ प्रियांकानं त्यावर लगेच उत्तर दिलं की, “तो एक माणूस, जो खूप साऱ्या एक्स्ट्रा करिकुलर एक्टिव्हिटीज करतो…”
प्रियांकाचा ‘लव्ह-इंटरेस्ट’, पती निक जोनासकडूनच खुलासा (Priyanka Chopra Nick Jonas Podcast)
जेव्हा तिचा मेहुणा केविन जोनासनं तिला त्या व्यक्तीचं, म्हणजेच त्या अभिनेत्याचं, नाव सांगण्यास सांगितलं, तेव्हा तिनं उत्तर दिलं की, “आपण जेव्हा लंचसाठी बाहेर जाऊ, तेव्हा मी तुला ते नाव सांगेन…” निक जोनासनं प्रियांकासोबतच्या नात्यातून त्याला काय मिळालं, हे सांगितल्यानंतर या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या आठ वर्षांच्या नात्यातील कोणती गोष्ट त्याला सर्वात जास्त आवडली, असं विचारल्यावर तो म्हणाला की, “या आठ वर्षांत मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, बॉलिवूडमधील गॉसिप ऐकायला मिळणं…”
Nick Jonas really slid into Priyanka Chopra’s DMs and immediately asked for a timestamped selfie to prove she wasn’t a catfish.
Nick: I saw your billboard on Sunset Boulevard and DM’ed you on Twitter.
Priyanka: We actually differ on that part of the story!
Joe: “Hello. I’ve… pic.twitter.com/No9yL0ZLm6
— Fola (@OFolaby) July 14, 2026
प्रियांकापेक्षा निक जोनासला जास्त बॉलिवूडमधील गॉसिप्स माहीत (Priyanka Chopra Nick Jonas On Bollywood Gossip)
प्रियांका चोप्रानं सांगितलं की, ती जरी भारतातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असली, तरी बॉलिवूडमधील गॉसिप्स आणि किस्से निक जोनासलाच सर्वाधिक माहीत असतात. ती म्हणाली, “हे खरं आहे. अशा काही गोष्टी असतात, ज्या मलाही माहीत नसतात… उदा. कोणाचं कोणाशी ब्रेकअप झालंय, हे मला माहीत नसायचं, आणि तूच मला त्याबद्दल सांगायचास…”
गॉसिप्ससाठी सोशल मीडिया अकाउंट्सना गपचुप करतो फॉलो (Priyanka Chopra Nick Jonas)
निक जोनासनं हे देखील सांगितलं की, त्याला बॉलिवूडमधील गॉसिप ऐकायला आणि त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. इतकं की, तो काही सोशल मीडिया अकाऊंट्स गुपचूप फॉलोही करतो. पण, सध्या तो कोणावर लक्ष ठेवून आहे, याबद्दल विचारल्यावर त्यानं कोणाचीही नावं घेण्यास नकार दिला. निक जोनास म्हणाला की, “मी नावं सांगू शकत नाही. ती आमची मित्रमंडळी आहेत, अशी माणसं जी आम्हाला ओळखतात. मी काही अकाऊंट्सवर गुपचूप लक्ष ठेवतो, म्हणजेच, मी फक्त त्यांच्यावर नजर ठेवतो. ती कोणती अकाऊंट्स आहेत, हे मी सांगणार नाही…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :