Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO


Rohit Sharma Retirement: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना काल कार्डिफ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवरील तिसरा वनडे निर्णायक ठरणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीकडे (Virat Kohli) सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पहिल्या वनडे साम्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने चांगली कामगिरी करत 65 धावा केल्या. तर रोहित शर्माला 26 धावा करता आल्या. दरम्यान, भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधूनही आता निवृत्ती (Rohit Sharma Retirement) घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे होणारा तिसरा आणि निर्णायक वनडे सामना हा रोहित शर्माचा भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, असा दावा विविध माध्यमांच्या अहवालांमध्ये करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, भारतीय निवड समितीने 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे त्याला कळवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची सध्याची वनडे मालिका त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची मालिका ठरू शकते. मात्र, रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत किंवा त्याला संघाबाहेर करण्याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी रोहित शर्माला तू भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे कळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Rohit Sharma Marathi News)

गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला- (Rohit Sharma Retirement Marathi News)

इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने 26 धावा केल्या. तर विराट कोहलीने 65 धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानाच्या गॅलरीत बसला होता. याआधी गौतम गंभीर आणि अजित आगकरकरांनी रोहित शर्माला बीसीसीआयचा पुढील प्लॅन सांगितला. तसेच तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, असा निरोपही धाडला. या निरोपानंतर रोहित शर्मा मैदानात शांत बसला होता. या मेसेजची माहिती विराट कोहलीपर्यंत पोहचली. त्यानंतर विराट कोहली रोहित शर्माच्या बाजूला येऊन बसला. यावेळी विराट कोहली खूप विचारात आणि दु:खी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तसेच रोहित शर्माच्या निवृत्तीवरुन विराट कोहलीचाही चेहऱ्यावरील रंग उडाल्याची चर्चाही सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. सध्या अजित आगरकर देखील इंग्लंडमध्ये आहेत. 

विराट कोहलीवर कायम विश्वास- (Virat Kohli ODI)

पीटीआयच्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे विराट कोहलीबाबत एकमत आहेत. कोहलीची सध्याची उत्कृष्ट फॉर्म आणि तंदुरुस्ती लक्षात घेता, विराट कोहली वनडे संघात आपोआप निवड होण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

रोहित शर्माची जागा यशस्वी जैस्वाल घेणार- (Rohit Sharma Retirement)

पीटीआयच्या माहितीनुसार, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडकर्त्यांनी आता 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे 39 वर्षीय रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग असण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, निवडकर्त्यांना यशस्वी जैस्वालला सातत्याने संधी द्यायची आहे. त्याने तीन डावांत दोन शतके झळकावली आहेत. आगामी सुमारे 20 वनडे सामन्यांत त्याला पुरेशा संधी मिळाव्यात, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे.

खरंच रोहित शर्मासाठी लॉईसवरील सामना अखेरचा ठरणार? (Rohit Sharma Lords Last ODI Match)

रोहित शर्माने 2024 च्या हंगामातील टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 7 मे 2025 रोजी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता इंग्लंड दौऱ्यातील लॉईसच्या मैदानातील सामना त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरेल, अशी चर्चा रंगली आहे. BCCI किंवा रोहित शर्मा यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *