सगळं पुणे गाढ झोपेत अन् अचानक हातात कोयते घेऊन आले ते तिघे; पहाटेच्या किर्र शांततेतच मोठं कांड, नागरिक भयभीत | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

पहाटेच्या शांततेत आणि अंधारात एकाच दुचाकीवरून तीन तरुण तोंडावर मास्क लावून केशवनगर परिसरात घुसले. त्यांनी गल्लीत येताच शांतता भंग करत “गौऱ्या कोण आहे? सुऱ्या कोण आहे?” अशा मोठमोठ्याने धमक्या देण्यास सुरुवात केली.

तरुणांचं धक्कादायक कृत्य
तरुणांचं धक्कादायक कृत्य

पुणे: पुण्यातील गुन्हेगारी आणि कोयता गँगची दहशत थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता पुण्याच्या मुंढवा-केशवनगर भागातून मध्यरात्रीच्या सुमारास थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. भरवस्तीत हातात तलवारी आणि कोयते घेऊन आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी आरडाओरडा करत गाड्यांची प्रचंड तोडफोड केली. या भयंकर प्रकाराचा एक अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना १७ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केशवनगरमधील एका रहिवासी भागात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा राडा पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या शांततेत आणि अंधारात एकाच दुचाकीवरून तीन तरुण तोंडावर मास्क लावून केशवनगर परिसरात घुसले. त्यांनी गल्लीत येताच शांतता भंग करत “गौऱ्या कोण आहे? सुऱ्या कोण आहे?” अशा मोठमोठ्याने धमक्या देण्यास सुरुवात केली.

या गुंडांनी हातात घेतलेले कोयते हवेत फिरवत एका बंगल्याच्या पार्किंगबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी आणि इतर वाहनांवर सपासप वार केले. कोयत्याच्या जोरदार वारांमुळे एका चारचाकी वाहनाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तर इतर गाड्याही फोडण्यात आल्या आहेत. शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रहिवासी भागात पहाटे साडेतीन वाजता झालेल्या या आवाजाने नागरिक भीतीने जागे झाले.

CCTV मध्ये कैद झाला थरार

तोंडावर मास्क लावून आलेल्या या तिन्ही गुंडांचा गाड्या फोडतानाचा आणि दहशत माजवतानाचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र थांबत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या मास्क घातलेल्या तिन्ही आरोपींची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केले आहे.

मराठी बातम्या/पुणे/

सगळं पुणे गाढ झोपेत अन् अचानक हातात कोयते घेऊन आले ते तिघे; पहाटेच्या किर्र शांततेतच मोठं कांड, नागरिक भयभीत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *