Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!


Rahul Gandhi on Sonam Wangchuk: दिल्ली पोलिसांनी गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणावर असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून चादरीआड नेत सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं आहे. नीट घोटाळ्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक हे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ उपोषण करत होते. पोलिसांनी बळजबरीचे समर्थन करताना सांगितले की, त्यांची ढासळती प्रकृती, वैद्यकीय तज्ञांचा सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूलभूत तत्त्वे 

दरम्यान, सोनम वांगचूक यांना बळजबरीने उचलण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूलभूत तत्त्वे आहेत. सोनम वांगचुक यांना त्यांच्या शांततापूर्ण उपोषणादरम्यान जंतर मंतरवरून हटवणे चुकीचे आहे. पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दे आहेत. भारताच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व प्रेम करणाऱ्या आम्हा सर्वांना हे मुद्दे मांडण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.

साध्या वेशात पोलीस आले

दरम्यान, आज शनिवारी पहाटे, अनेक साध्या वेशातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने जंतर मंतर येथे दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसर सील केला. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्याभोवती चादरीचे पडदे लावण्यात आले आणि त्यांना बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान, सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली, घोषणाबाजी केली, पण पोलिसांनी कार्यकर्त्यांची सुद्धा धरपकड सुरु केली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांना अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई केवळ त्यांची ढासळती प्रकृती आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून करण्यात आली.

सफदरजंग रुग्णालयाने सांगितले की, सोनम वांगचुक यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. दीर्घकाळच्या उपोषणामुळे आणि निर्जलीकरणामुळे ते खूप अशक्त झाले आहेत. सध्या तो शुद्धीवर आहे, त्याच्या महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या सामान्य आहेत, परंतु त्याला सतत देखरेख, उपचार आणि वैद्यकीय निरीक्षणाची गरज आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *