Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?


Sonam Wangchuk Protest: दिल्ली पोलिसांनी आज (शनिवारी) गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींप्रमाणे अभिनेता हृतिक रोशन, कुशा कपिला आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलकांना आंदोलनस्थळ रिकामे करण्याच्या सूचना दिल्या. नीटसारख्या मोठ्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक 28 जूनपासून आमरण उपोषण करत होते.

याआधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण राव, शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता या यादीत हृतिक रोशनचाही समावेश झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “हे खरंच गंभीर आहे. एका चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना कोणत्या मानसिक तणावातून जावे लागते, याची मला जाणीव झाली होती.”

Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?

हृतिकने सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांचा एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये वांगचुक यांनी कथित पेपरफुटी प्रकरणावर लोकांच्या शांततेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, या प्रकारामुळे 20 हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. डॉक्टर किंवा अभियंता होण्यासाठी विद्यार्थी आयुष्यभर मेहनत घेतात आणि अशा पेपरफुटीमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

शत्रुघ्न सिन्हा यांचाही पाठिंबा

शुक्रवारी रात्री अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनीही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी मुलगी सोनाक्षी सिन्हाचे कौतुक करत म्हटले की, तिने योग्य वेळी निर्भीडपणे भूमिका घेतल्याचा मला अभिमान आहे.असंही म्हटलं. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “हवामान कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक हे नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करत आहेत. गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून प्रकृती खालावत असतानाही ते एका योग्य उद्देशासाठी संघर्ष करत आहेत. देश-विदेशातील अनेक राजकीय नेते, पक्ष, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याने केंद्र सरकार, संबंधित यंत्रणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा आणि हे आंदोलन लवकरात लवकर संपवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.”

शेवटी त्यांनी आपल्या मुलगी सोनाक्षीबद्दल लिहिले, “सोनम वांगचुक यांना वाचवा! माझ्या कुटुंबाचा अभिमान असलेल्या माझ्या प्रिय मुलीने, सोनाक्षीने योग्य वेळी धाडसाने आपली भूमिका मांडली. त्यामुळे आज मला तिचा आणखी अभिमान वाटत आहे.”आज सोनम वांगचुक यांना रुग्णालयात जबरदस्ती हलवण्यात आले, त्यावरूनही त्यांनी पोस्ट केलीय.

 

ते म्हणाले,” संघर्ष नव्हे, तर सहमती हा मार्ग असायला हवा. सर्वोच्च दर्जाचे समाजसेवक आणि एक सज्जन व्यक्तिमत्त्व असलेले सोनम वांगचुक हे सध्या नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करत आहेत.दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांच्या रास्त मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी तरुण पिढीच्या भविष्याशी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाशी संबंधित या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची आणि समर्थकांची संमती न घेता मध्यरात्री पोलिसांकडून जबरदस्तीने रुग्णालयात हलवण्यात आल्याचा आरोप आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.माननीय महोदय, हे योग्य आहे का? ही लोकशाहीची पद्धत आहे का? उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला माझा पाठिंबा.सोनम वांगचुक यांना वाचवा! लोकशाही वाचवा!”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *