Last Updated:
वर्गाच्या मॉनिटर सारखं सांगू नका, रामरक्षा पाठ आहे की नाही, रामाची रक्षा करण्यासाठी रामभक्तांना समोर यावं लागतं आहे, यापेक्षा दुर्दैव काय आहे.
नागपूर: “मंदिर वही बनायेंगे” कशाला लुटण्यासाठी? आम्ही आहोत मंदिरा लुटारूंच्या विरोधात आहोत, फडणवीस यांनी आमची चेष्टा, टिंगल करण्याचे सोडून द्यावे, आधी हे सांगा तुम्ही रामरक्षा करणाऱ्याच्या बाजूने आहात की मंदिर लुटारूंच्या बाजूने आहात हे आधी सांगा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. तसंच, ‘वर्गाच्या मॉनिटर सारखं सांगू नका, रामरक्षा पाट आहे की नाही, रामाची रक्षा करण्यासाठी रामभक्तांना समोर यावं लागतं आहे, यापेक्षा दुर्दैव काय आहे’ असा सणसणीत टोलाही लगावला.
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये दाखल झाले आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिकांच्या उपस्थितीत रामरक्षा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केला.
“संजय राऊत म्हणाले, टेलिप्रांटर ठेवायचं का, मी म्हटलं का? फडणवीस यांनी चॅलेंज दिलं होतं की, रामरक्षा म्हणून दाखवायची. पण, रामरक्षा म्हणण्याचं तुमचं काम असलं तरी रामरक्षा करण्याचं आमचं काम आहे. आम्ही राम रक्षक आहोत. मनी नाव भाव आणि देवा मला पाव असं आमचं हिंदुत्व नाही. पहिली बातमी दिल्लीतून आली. सोनम वांगचूक हे आंदोलन करत होते, पोलीस आंदोलनात घुसले आणि वांगचूक यांना घेऊन गेले. प्रभू रामचंद्रांना विचारतोय, रामाचं नाव समोर करून भाजप सरकार स्थापन झालं. पण यांच्या अंगामध्ये सैतान आला आहे का, इतकं कसं माजल्यावानी वागत आहे.
मोहन भागवत यांना विचारायचंय, भागवत साहेब ज्या पद्धतीने भाजप सरकार वागतंय, मंदिर लुटली जात आहे. पेपर फुटताय, पक्ष तर फोडले जात आहे, मंदिरातून तिजोऱ्या फोडल्या जात आहे, हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय, आमचं हिंदू हे नाही, आम्हाला रामराज्य हवं आहे. कंत्राटदारांना अभय देणारं हिंदू राष्ट्र नकोय, भागवत साहेब, तुम्ही बोलला होता, या देशातील मुस्लीम हे हिंदूच आहे, त्यामुळे हिंदूंंनी २ ते ३ अपत्य जन्माला घालायला पाहिजे. मग ही आपत्या जन्माला घातली आणि पेपर फुटले, त्यांचं काय करणार, आणखी अपत्य जन्माला घालून त्यांनाही चिरडणार का, हे हिंदू राष्ट्र अपेक्षित नाही.
बाबरी मशिद पाडला तेव्हा फक्त भाजपचे नेते पळून गेले होते, तेव्हा बाळासाहेबांंनी हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर गर्व से कहो हम हिंदू है, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. अनेकांनी आंदोलन केलं, अनेक जण जेलमध्ये गेले, बाळासाहेबांनी जो धोका घेतला होता. मंदिर वही बनायेंगे कशाला लुटण्यासाठी? आम्ही आहोत मंदिरा लुटारूंच्या विरोधात आहोत, फडणवीस यांनी आमची चेष्टा, टिंगल करण्याचे सोडून द्यावे, आधी हे सांगा तुम्ही रामरक्षा करणाऱ्याच्या बाजूने आहात की मंदिर लुटारूंच्या बाजूने आहात हे आधी सांगा.
वर्गाच्या मॉनिटर सारखं सांगू नका, रामरक्षा पाठ आहे की नाही, रामाची रक्षा करण्यासाठी रामभक्तांना समोर यावं लागतं आहे, यापेक्षा दुर्दैव काय आहे.
Nagpur,Maharashtra
‘आधी हे सांगा तुम्ही मंदिर लुटारूंच्या बाजूने आहात की रामरक्षकांच्या?’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
