तोतया DCP बनून बड्या लोकांना फसवलं, कोट्यवधी कमावले, आरोपी चक्क रेल्वे पोलिसांतील सहाय्यक फौजदार निघाला! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

आरोपी मोहम्मद गौस इब्राहिम खतीब हा गेल्या दशकभरापासून आपण डीसीपी दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करीत होता.

तोतया डीसीपीला अटक
तोतया डीसीपीला अटक

संकेत, वरक, प्रतिनिधी मुंबई : गेल्या १० वर्षांपासून तोतया पोलीस उपायुक्त (DCP) बनून सेलिब्रिटींसह सर्वसामान्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून, अटक करण्यात आलेला आरोपी दुसरा कोणी नसून लोहमार्ग पोलिसांतील सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब आहे.

बड्या सेलिब्रिटींसोबत वावर आणि बनाव

आरोपी मोहम्मद गौस इब्राहिम खतीब हा गेल्या दशकभरापासून आपण डीसीपी दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करीत होता. आपले ‘वजन’ वाढवण्यासाठी तो बड्या सेलिब्रिटींसोबत वावरत असे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते आपण डॉक्टरेट स्वीकारल्याचा खोटा दावा त्याने केला होता, तसेच प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचे त्याचे फोटोसेशनही समोर आले आहे. या हाय-प्रोफाइल फोटोंचा वापर करून तो लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे.

फसवणुकीसाठी अनेक आमिषं

आरोपीने पोलीस अधिकारी असल्याचा गैरफायदा घेत अनेकांना विविध प्रकारची आमिषे दाखवली. शासकीय किंवा पोलीस खात्यात नोकरी लावून देणे, विविध बँकांकडून मोठी कर्जे मंजूर करून देणे, कोर्टकचेरी किंवा इतर कारणांमुळे अडकलेले पैसे काढून देणे, अशा आमिषांना बळी पडून अनेक व्यावसायिकांनी आणि सर्वसामान्यांनी त्याला लाखो रुपये दिले. गेल्या १० वर्षांत त्याने अशा प्रकारे शेकडो लोकांना फसवून कोट्यवधींची माया गोळा केल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे.

गुन्हे शाखेकडून अटक, तपास सुरू

या तोतया अधिकाऱ्याच्या वाढत्या तक्रारींनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब याला बेड्या ठोकल्या आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच खात्याची बदनाम केल्यामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

तोतया DCP बनून बड्या लोकांना फसवलं, कोट्यवधी कमावले, आरोपी चक्क रेल्वे पोलिसांतील सहाय्यक फौजदार निघाला!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *