Sonam Wangchuk : नीट पेपरफुटीच्या (NEET paper leak) विरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केलं आहे. नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. मात्र, वांगचुक यांनी रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती
सफदरजंग रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सोनम वांगचुक यांनी डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची कमतरता आहे. तसेच चयापचय विकारांची लक्षणे दिसत आहेत. अशातच त्यांनी रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वांगचुक यांच्यावर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांना उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर (Jantar Mantar) येथील आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात (Hospital) दाखल केल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर या प्रकरणावरुन जोरदार टीका होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर जंतर मंतर या ठिकाणी अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. जंतर मंतरवर मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.
onam Wangchuk hunger Strike: 28 जूनपासून सोनम वांगचुक हे ‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात उपोषणावर
गेल्या 28 जूनपासून सोनम वांगचुक हे ‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात उपोषणावर (Hunger Strike) बसले होते. त्यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) हे देखील आंदोलनात सहभागी होते. या 20 दिवसांच्या उपोषणात वांगचुक यांचे तब्बल 9 किलो वजन घटले असून, अंतर्गत अवयवांना गंभीर इजा होण्याचा धोका डॉक्टरांनी वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर, दिल्ली हायकोर्टाच्या (High Court) आदेशाचा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी आज पहाटे वांगचुक यांना वैद्यकीय देखरेखीखाली रुग्णालयात हलवले. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. वांगचुक यांनी 20 जुलै रोजी होणाऱ्या ‘संसद मार्च’चे आवाहन केले असल्यामुळे, आगामी काळात या मुद्द्यावरून दिल्लीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’