Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 


नवी दिल्ली : नीट पेपरफुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी नवी दिल्लीतील सुरू झालेल्या आंदोलनाने आता व्यापक स्वरुप धारण केल्याचं दिसतंय. एकीकडे अभिजीत दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन तीव्र केल्यानंतर त्याला आता राजकीय बळही मिळताना दिसत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला, असा प्रश्न विचारत राहुल गांधींनी काँग्रेसच्या खासदारांसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निवासस्थान गाठल्याचं दिसून आलं. त्यावेळी शिक्षण मंत्र्यांसोबत आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

नीट पेपरफुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं. मात्र दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचू दिलं नाही. या परिसरात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ अभिजीत दिपके यांनी जंतर मंतरव आंदोलन सुरू केलं आहे.

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी खासदारांसह धडकले

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी पोलिसांनी संसदेपर्यंत पोहोचू दिलं नसलं तरी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी, काँग्रेसचे खासदार आणि नेते उपस्थित होते. राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या घराला घेरावा घातला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला असा सवाल राहुल गांधी यांनी केला. तसेच मोदी सरकारमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्याची जबाबदारी कुणी घेणार आहे की नाही? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.

Delhi Jantar Mantar Protest : पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाचा आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. 

Jitendra Singh Meet Rahul Gandhi : सरकारचा मंत्री राहुल गांधींच्या भेटीला

एकीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेरावा घातला असताना त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन हे पोहोचले. जितेंद्र सिह यांनी राहुल गांधी यांच्यासोबत सुमारे अर्धा तास चर्चा केली आणि पंतप्रधानांच्या घराबाहेर सुरू असलेले आंदोलन थांबवावे अशी मागणी केली. त्यावेळी राहुल गांधी यांनीही त्यांच्या बाजू मांडली. 

सुमारे अर्धा तासांच्या चर्चेनंतरही राहुल गांधी हे आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव हे आंदोलनाच्या ठिकाणाहून निघून गेले. 

ही बातमी वाचा: 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *