PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट


IPL 2026 PBKS Knocked OUT : महिनाभरापूर्वी प्लेऑफसाठी सर्वात मजबूत दावेदार मानला जाणारा पंजाब किंग्स संघ अखेर टॉप-4 च्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. एकेकाळी प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं मानली जाणारी पंजाब किंग्सची गाडी अखेर रुळावरून घसरली. 24 मे रोजी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करताच पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न एका क्षणात तुटलं आणि आयपीएल 2026 च्या टॉप-4 संघांचे चित्र स्पष्ट झाले. 

वादळी सुरुवात आणि स्वप्नवत कामगिरी (Punjab Kings IPL 2026)

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात अक्षरशः वादळासारखी केली होती. गुजरात टायटन्सविरुद्ध दमदार विजय मिळवत त्यांनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सलाही त्यांनी धूळ चारली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, पण या अडथळ्यानंतर पंजाबने सलग चार सामने जिंकत मैदानात धुमाकूळ घातला. त्यांनी सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सर्व संघांना पराभवाचा धक्का दिला.

पहिल्या 7 सामन्यांमध्ये 6 विजय अशा जोरदार कामगिरीमुळे पंजाबच्या खात्यात 13 गुण जमा झाले होते. 25 एप्रिलला दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर पंजाबचं प्लेऑफमधील स्थान निश्चित मानलं जात होतं. जर त्यांनी राजस्थान आणि गुजरातविरुद्धचे पुढचे सामने जिंकले असते, तर संघ 17 गुणांसह तब्बल 21 दिवस आधीच प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला असता.

सलग 6 पराभव अन् सगळं संपलं (IPL 2026 PBKS Knocked OUT)

मात्र, इथूनच पंजाबच्या नशिबाने पलटी खाल्ली. 28 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांना हंगामातील पहिला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर संघाची घसरगुंडी सुरू झाली. राजस्थाननंतर गुजरात टायटन्सने पंजाबला धक्का दिला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी पंजाबला सलग पराभवांची चव चाखवली. फलंदाजीतील अपयश आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी गमावलेले नियंत्रण यामुळे सलग 6 पराभवांनी पंजाबचं संपूर्ण गणितच कोलमडून टाकलं.

अखेरचा खेळ आणि शेवटचा धक्का

24 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवत पंजाबने 15 गुणांपर्यंत मजल मारली खरी आणि आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच दिवशी दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला हरवून 16 गुणांसह प्लेऑफमध्ये धडक मारली. राजस्थानच्या या विजयामुळे पंजाबचे आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले.

हे ही वाचा –

MI Vs RR IPL 2026 : फक्त ‘त्या’ 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *