Oscar Winning Hollywood Film Avtaar Was Stolen From Bollywood: बॉलिवूड (Bollywood News) सिनेमांवर अनेकदा साऊथचे सिनेमे (South Movie) आणि हॉलिवूड सिनेमांच्या (Hollywood Movie) कथा चोरल्याचा आरोप केला जातो. म्युझिकबाबतही असाच आरोप केला जातो. गाण्यांपासून ते बॅकग्राउंड स्कोअरपर्यंत अनेक गोष्टींची नक्कल केल्याचे दावे केले जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का? हॉलिवूडनंही हिंदी सिनेमांची (Hindi Movies) कथा चोरली आहे? असा दावा प्रसिद्ध कॉमेडियन राजीव ठाकूर (Comedian Rajiv Thakur) यानं केला आहे. त्यानं एका मोठ्या आणि प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार (Academy Awards) विजेत्या हॉलिवूड सिनेमावर बॉलिवूडची कथा चोरल्याचा आरोप केला आहे.
एका पॉडकास्टवर बोलताना राजीव ठाकूर म्हणाले की, “लोक अनेकदा म्हणतात की, भारत हॉलिवूड सिनेमांची नक्कल करतो, पण जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार’ (Avatar) हा अनिल कपूर यांच्या 1980 च्या दशकातील ‘ठिकाना’ (Thikana) या बॉलिवूड सिनेमाची नक्कल आहे…” त्यांनी ‘ठिकाना’ सिनेमाची कथा सांगितली आणि ठामपणे सांगितलं की, ती ‘अवतार’च्या कथेशी तंतोतंत जुळते, अगदी “10 पैकी 10” गुण मिळण्याइतपत साम्य त्यात आहे.
राजीव ठाकूर यांचा धक्कादायक दावा
वैभव मुंजाल यांनी विचारलं की, राजीव जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित ‘अवतार’ सिनेमाबद्दल बोलत आहात का? त्यावर राजीव ठाकूर म्हणाले की, “हो, जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार’. मी इथे एक धाडसी वक्तव्य करतोय. पण जर तुम्ही ‘ठिकाना’ची कथा ऐकली, तर तुमचीही खात्री पटेल की, त्याची कथा अगदी ‘अवतार’सारखीच आहे…”
राजीव ठाकूरनं सांगितली अनिल कपूरच्या ‘ठिकाना’ची कथा
त्यानंतर राजीव ठाकूर यानं ‘ठिकाना’ सिनेमाची कथा सांगायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं की, “हा सिनेमा पोलीस अधिकाऱ्यांभोवती फिरतो, ज्यामध्ये अनिल कपूर यांनी पोलीस दलातील एका सदस्याची भूमिका साकारली आहे. यात एका गावात राहणाऱ्या दरोडेखोरांचा गटही आहे, प्राण यांनी त्यांच्या म्होरक्याची भूमिका साकारली आहे आणि पूनम ढिल्लन त्यांची मुलगी आहे. पोलीस अनिल कपूर यांना दरोडेखोराचा वेष धारण करून त्या टोळीत घुसखोरी करण्यास सांगितलं जातं. ते ठरल्याप्रमाणे दरोडेखोरांच्या टोळक्यात घुसतात आणि आपल्या मोहिमेत यशस्वी होतात. या प्रवासात त्यांना पूनम ढिल्लन यांच्यावर त्यांचा जीव जडतो आणि ते दोघे मिळून गावातील सर्व दरोडेखोरांना शरणागती पत्करण्यास राजी करतात…”
राजीव ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, “मात्र, पोलीस दलातच एक भ्रष्ट अधिकारी असतो, जो सर्व दरोडेखोरांचा खात्मा करण्यावर ठाम असतो. तो गावावर हल्ला करण्याचा निर्णय घेतो. अनिल कपूर त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात आणि आपण दरोडेखोरांना शरणागती पत्करायला लावू शकतो, अशी खात्री देतात. पण तो भ्रष्ट अधिकारी हल्ल्याच्या निर्णयावर ठाम राहतो आणि योजनेनुसार पुढे जातो. अशा वेळी, स्वतः पोलीस अधिकारी असूनही, अनिल कपूर दरोडेखोरांच्या बाजूनं लढण्याचा निर्णय घेतात…”
जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार’ची कहाणी काय?
‘अवतार’ ही जेक सली या माजी मरीनची कथा आहे, जो ‘रिसोर्स डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन’ला (RDA) पँडोरा ग्रहावरून ‘अनऑब्टेनियम’ (Unobtanium) हे मौल्यवान खनिज मिळवण्यात मदत करण्यासाठी जनुकीयदृष्ट्या तयार केलेल्या ‘नावी-मानव’ (Na’vi-human) संकरित शरीराचा वापर करतो. मात्र, जेकचे ‘नावी’ जमातीच्या प्रमुखाच्या मुलीवर, नेतिरीवर प्रेम जडतं. जेव्हा कर्नल माइल्स क्वारिच त्या जमातीवर हल्ला करतात, तेव्हा जेक आपली बाजू बदलतो आणि ‘नावी’ लोकांच्या बाजूनं लढतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :