15 Jul 2026 08:55 AM (IST)
नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिक मधील नगरसेवक आज ठाकरेंच्या भेटीला
शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चेनंतर नाशिकच्या नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक. नाशिक मधील नगरसेवकांना मुंबईत बोलावून पक्षशिस्तीचा आढावा घेत एकनिष्ठतेची खात्री केली जाणार. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः बोलवली नाशिक मधील 15 नगरसेवकांची बैठक. बैठकीला नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या 15 नगरसेवकांपैकी किती नगरसेवक उपस्थित राहणार याकडे लक्ष
15 Jul 2026 08:50 AM (IST)
नवी मुंबई विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे अबू धाबीला जाणारे विमान बुधवारी १५ जुलै पहाटे २:३० वाजता विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवेचा औपचारिक शुभारंभ केला. देशांतर्गत सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर सुमारे २०० दिवसांनी, NMIA जागतिक हवाई नेटवर्कशी जोडले जाईल. एअर इंडिया एक्सप्रेस या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस थेट विमानसेवा चालवेल, ज्यामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना UAE ला प्रवास करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.
15 Jul 2026 08:40 AM (IST)
नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
नियमभंगाविरोधात कृषी विभागाकडून करण्यात आली कठोर कारवाई जिल्हात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने करण्यात आली कारवाई. भावफलक , साठाफलक e-POS साठ्यातील अनियमितता, ‘एम’ फॉर्ममधील देयके न देणे, शेतकऱ्यांच्या बिलावर स्वाक्षरी न घेणे यासारख्या आढळून आल्या त्रुटी. एक एप्रिल पासून तर आत्तापर्यंत खते विक्रीचे 90 परवाने, बियाणे विक्रीचे 10 परवाने, कीटकनाशक विक्रीचे 12 परवाने असे एकूण 112 परवाने केले निलंबित
15 Jul 2026 08:35 AM (IST)
शहजाद भट्टी समर्थकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
एटीएसने ताब्यात घेतलेले काही संशयित लॉरेन्स बिश्नोई गँगचेही ‘फॉलोअर’ एटीएसच्या कसून चौकशीनंतर २१ पैकी १५ संशयितांची सुटका. उर्वरित संशयितांच्या डिजिटल डेटाची, तसेच आंतरराष्ट्रीय चॅटिंगची पडताळणी अद्याप सुरू. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया खात्यांना समर्थन दिल्याप्रकरणी एटीएस कडून करण्यात आली होती कारवाई
15 Jul 2026 08:30 AM (IST)
परभणी जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, थेट शालेय पोषण आहारात..
परभणीच्या नऱ्हापूर येथे जिल्हापरिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे,अळ्या आणि जाळे निघाल्याचा प्रकार उघड.हेच अन्न विद्यार्थ्यांना शिजवून दिलं जात असल्याचा शाळा समिती आणि गावाकऱ्यांचा आरोप. मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा गावाकऱ्यांची मागणी..
15 Jul 2026 08:20 AM (IST)
मुंबई गोवा महामार्गावर अपघात, लांजा रेस्ट हाऊस इथे हा अपघात
अपघातात तीन जण जागीच ठार. पघातात दोन महिला एक मुलगा यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. मुंबईच्या दिशेने जाणारा क्रेटा कारची डंपर ला मागून धडक. मुंबई आगरी पाडा येथे राहणाऱ्या हे कुटुंब गोव्यातून मुंबईला परत असताना झाला अपघात
15 Jul 2026 08:16 AM (IST)
बोगस बियाणे देत शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल
बाभुळगांव पोलिस ठाण्यात बुस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल. बनावट व निकृष्ट दर्जाचा सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी बाभुळगांव पोलिसात कंपनीवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी च्या आदेशानंतर बाभुळगांव तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. बाभुळगांव पोलिसात कलम BSN 2023 च्या कलम 318(4) फसवणूक करणे,अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 बीज अधिनियम 1966 कलम 6(A) 7(B)19 आणि 21 अन्वये गुन्हा काल रात्री उशिरा दाखल