Shukra Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा सुख, समृद्धी, धन-वैभव आणि संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. येत्या 16 जुलै 2026 रोजी म्हणजेच उद्याच्या दिवशी शुक्र नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शुक्र देव याच दिवशी सिंह राशीतून मघा नक्षत्रातून निघून पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
पूर्वफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी ग्रह स्वत: शुक्र देव आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा एखादा ग्रह आपल्या स्वामित्व असलेल्या नक्षत्रात प्रवेश करतो. तेव्हा त्याची शक्ती दुप्पट होते. हा अत्यंत शुभ काळ मानला जातो. शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने 4 राशींवर चांगलाच परिणाम होणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, उत्पन्नाची नवीन साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला दुप्पट नफा मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे या नक्षत्र परिवर्तनाचा थेट परिणाम सिंह राशीवर होणार आहे. या कालावधीत तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा लाभ घेता येईल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. तसेच, काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही योग्यरित्या पार पाडाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीचा स्वामी स्वत: शुक्र ग्रह आहे. त्यामुळे स्वत:च्याच राशीत होणारं नक्षत्र परिवर्तन हे तूळ राशीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या काळात तुमच्या वाणीत मधुरता जाणवेल. तुमच्या रागावर तुमचं नियंत्रण राहील. तसेच, या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता नक्की ऐकायला मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी देखील शुक्राचं नक्षत्र परिवर्तन भाग्याचं ठरणार आहे. जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार लकी ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या कालावधीत पूर्ण करता येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य