Kolhapur : गळ्यावर जखमा…अस्मिताने स्वत:ला संपवलं नाही तर घातपात? PM रिपोर्ट येण्याआधी पोलिसांचा मोठा दावा, काय सांगितलं? | कोल्हापूर बातम्या


Last Updated:

Kolhapur Asmita katkar Death Case : अस्मिताच्या गळ्यावरील व्रण, प्राथमिक तपास आणि सासरच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिने आत्महत्याच केली असावी, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Kolhapur Asmita katkar Death Case was it murder Police
Kolhapur Asmita katkar Death Case was it murder Police

Kolhapur Asmita katkar Crime News : कोल्हापुरातल्या एक महिन्याच्या तान्हुलीच्या आईनं गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. अस्मिता प्रतिकसिंह काटकर असं मृत महिलेचं नाव असून तिने सासरच्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं आहे. सततचे टोमणे अन् सासरच्यांची पैशांची भूक वाढतच असल्याने तिने स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. राहत्या घरी तिने आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, अस्मिताने खरंच आत्महत्या केली की तिचा घातपात झाला? असा सवाल विचारला जात आहे. त्यानंतर आता पोलिसांनी मोठी दावा केलाय.

अस्मिता घातपात झाला का?

अस्मिता घातपात झाला का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर घातपात नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अस्मिताचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्ट यायला अजूनही 15 ते 20 दिवस लागण्याची शक्यता आहे. अस्मिताच्या पीएम रिपोर्ट आला की सगळी माहिती समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं. पण, तिच्या गळ्यावरील व्रण, प्राथमिक तपास आणि सासरच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिने आत्महत्याच केली असावी, असा दावा पोलिसांनी केला आहे.

अस्मिताच्या माहेरच्या नातेवाईकांनी संशय

घरात अस्मिता यांच्या 1 महिन्याच्या मुलीच्या बारशाची लगबग सुरू होती. अशातच ही धक्कादायक घटना घडल्याने काटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अस्मिताच्या गळ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे अस्मिताच्या माहेरच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून पुढील तपास सुरू आहे. न्यायाधिशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं समजतंय.

चिमुकलीची जबाबदारी प्रतिकसिंगच्या मावशीकडे

अस्मिताच्या माहेरच्या नातेवाइकांनी चिमुकलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यामुळे चिमुकलीच्या वडिलांच्या चुलतीने तिची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी त्यानंतर बालकल्याण मंडळापुढे चिमुकलीला हजर केलं होतं. त्यानंतर मंडळाच्या आदेशानंतर आता एका महिन्याच्या चिमुकलीची जबाबदारी प्रतिकसिंगच्या मावशीकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *