अनेकदा वहिनीला समजावलं, माझ्या नवऱ्यापासून लांब राहा, पण ऐकतच नव्हती..अखेर एके दिवशी नणंदेनं जे केलं त्याने सगळेच हडबडले – Marathi News | Uttarpradesh meerut murder case solved sister in law stabs bhabhi extramarital affair case


निदा हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी महत्वाचा खुलासा केला आहे. निदाची हत्या तिच्या नणंदेनेच केली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू ताब्यात घेतला आहे. 12 जुलैला निदा नावाच्या महिलेची राहत्या घरातच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मंगळवारी या हत्याकांडाचा खुलासा करताना मृत निदाची नणंद रिमशा, तिचा पती उवैश यांना अटक केली. हत्येत वापरलेला चाकू सुद्धा ताब्यात घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे. पोलीस तपासानुसार मृत निदाचे रिमशाचा पती उवैशशी संबंध होते. त्यावरुन बऱ्याच काळापासून घरात वाद सुरु होते. त्याच वादातून रविवारी 12 जुलैला रिमशाने किचनमध्ये ठेवलेल्या भाजी कापायच्या चाकूने निदावर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केलं. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

पोलीस अधिकारी संग्राम सिंह यांनी सांगितलं की, 12 तारखेला निदाचं हत्या प्रकरण समोर आलं. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. लिसाडी गेट पोलीस ठाण्याने हत्याकांडाचा खुलासा केला. पोलीस तपास आणि टेक्निकल सर्विलान्समधून हे समोर आलं की, मृत निदाची उवैश सोबत जवळीक वाढली होती. उवैश नात्यात निदाचा भाऊजी लागायचा. निदाच्या नवऱ्याच्या बहिणीचा तो नवरा होता. याचं गोष्टीवरुन नणंद रिमशा सतत निदाशी भांडायची. वहिनीची दुसऱ्याच्या नवऱ्याबरोबर ही जवळीक रिमशाला मान्य नव्हती. तिचा संसार संकटात होता. त्यातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं.

निदाच्या छातीवर वार

गुन्हा घडला त्या दिवशी रिमशा दुपारी 12 वाजता माहेरी आलेली. तिच्या नवऱ्यासोबत निदा जवळीक वाढवतेय, याच मुद्यावरुन दोघींमध्ये भांडणं झालं. वाद वाढल्यानंतर रागाच्या भरात रिमशाने किचनमधला चाकू उचलला व निदाच्या छातीवर वार केले. यात निदाचा मृत्यू झाला. पोलीस चौकशीत रिमशाने आपला गुन्हा कबूल केला. रिमशाने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू ताब्यात घेतला. या सगळ्या प्रकरणात कोण-कोण सहभागी आहेत, त्यांची भूमिका काय आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *