IND vs ENG: गिल फक्त नावाला कॅप्टन, मैदानावर राज आजही रोहितचंच, हिटमॅनचा एक निर्णय अन् टीम इंडिया जिंकली – Marathi News | Rohit sharma one decision impactful for team india in ind vs eng 1st odi


भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकून विजची सुरुवात केली आहे. भारतीय संघाची सुरुवात जरी विजची झाली असली तरीही चाहते विशेष काही खुश नाही कारण रोहित शर्मा आणि विराट कोहलीनला विशेष धावा करता आलेल्या नाही. खरं तर इंग्लंडमधील मैदानावर रोहित शर्माची फलंदाजी यशस्वी ठरतेच, आणि जर ते एडजबॅस्टन असेल, तर धावा तर हमखास होतात. पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तसे झाले नाही. रोहित शर्मा फलंदाजीला आला, त्याने चांगली सुरुवात केली, पण नंतर एक अत्यंत खराब फटका खेळून तो बाद झाला. मोठी गोष्ट म्हणजे रोहितने 21व्या चेंडूवर चूक केली; तो स्थिरावला होता, पण सॅम करनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो ब्रूकच्या हाती झेलबाद झाला.

रोहित शर्माची बॅट एडजबॅस्टनवर नेहमीच चांगली कामगिरी करते. या मैदानावरच्या त्याच्या मागील चार सामन्यांमध्ये त्याने 91, 123, 102 आणि 104 धावा केल्या होत्या. मात्र, त्याच्या शेवटच्या डावात तो केवळ 11 धावाच करू शकला. रोहित शर्माने बॅटने फार काही केले नाही, पण त्याने क्षेत्ररक्षणात आपली ताकद दाखवून दिली. इंग्लंड फलंदाजी करत असताना, रोहित शर्मा क्षेत्ररक्षणाची जबाबदारीही सांभाळत होता. जेव्हा ब्रुक फलंदाजीला आला, तेव्हा त्याचा उत्कृष्ट फलंदाजीचा फॉर्म पाहून, रोहितच्या सांगण्यावरून गिलने बुमराहला आक्रमणासाठी पाठवले. नेहमीप्रमाणे बुमराबने आपली जादू दाखवत इंग्लंडच्या कर्णधाराची विकेट घेण्यात यश मिळवले. ब्रुकचा झेल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने घेतला. झेल घेतल्यानंतर रोहितने पॅव्हेलियनकडे बोट दाखवले. असा दावा केला जात आहे की, ब्रुकविरुद्ध बुमराहला आक्रमणासाठी पाठवायला स्वतः रोहितनेच गिलला सांगितले होते. ही रणनीती यशस्वी ठरली आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या ब्रुकला केवळ तीन चेंडूंचा सामना करावा लागला.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची फलंदाजी अयशस्वी ठरली. इंग्लंडने अवघ्या 80 धावांत पाच विकेट गमावल्या. बेन डकेटच्या 43 धावांनंतर, इंग्लंडची मधली फळी पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली. ब्रुकने केवळ एक, बटलरने पाच धावा केल्या आणि करन नाबाद राहिला. पण मग जो रूटने 76 आणि लियाम डॉसनने 68 धावा करून इंग्लंड संघाला वाचवले आणि इंग्लंड संघाने कसाबसा 258 धावांचा टप्पा गाठला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *