Sanjay Dina Patil Operation Tiger: संजय दिना पाटील सकाळी तावातावाने म्हणाले, संजय राऊत, अरविंद सावंत आमचे नेते, दुपारपर्यंत सगळ्यांचाच घात केला!


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशन टायगर आज सक्सेसफुल झाल्याचं दिसून आलं आहे, तर काल (मंगळवारी, ता16) रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Operation Tiger UBT Shivsena) हे देखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी मिशन टायगर मधील एक खासदार ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील देखील आहेत. ते दिल्लीला असले तरी त्यांच्या घराजवळ कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भांडुप हा शिवसेना ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, याच भांडुप मध्ये संजय पाटील यांचे घर आणि कार्यालय आहे. त्यामुळे इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ही सतर्क झाल्याचे पाहायला मिळते आहे. 

Sanjay Dina Patil Delhi : जे जाणार ते तुम्हाला दिसतील… आम्हाला हैराण करू नका…

तर सकाळच्या सुमारास खासदार संजय दिना पाटील यांच्याशी एबीपीच्या प्रतिनिधींनी फोनवरून चर्चा केली, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्याला जायचं ते जातील…जे जाणार ते तुम्हाला दिसतील… आम्हाला हैराण करू नका. संजय राऊत अरविंद सावंत हे आमचे नेते आहेत, ते यावर बोलतील, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, यावेळी संजय दिना पाटील यांनी एक प्रकारे संताप व्यक्त केलेला होता. ज्यांना जायचं ते जातील ते तुम्हाला दिसतीलच असं संजय दिना पाटील यांनी म्हटलेलं, संजय दिना पाटील हे मुंबईतले खासदार आहेत, ज्यावेळी ठाकरेंनी बैठक बोलवलेली होती, त्या बैठकीला संजय दिना पाटील उपस्थित होते.

Sanjay Dina Patil Delhi : पाटील यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये शुकशुकाट

खासदार ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आपल्याला मशाल हे चिन्ह पाहायला मिळत आहे. संजय दिना पाटील यांचं कार्यालय आणि घर असं दोन्ही एकाच ठिकाणी आहेत, त्यांच्या गाड्या तिथे पार्क केल्याचे दिसून येत आहेत. संजय दिना पाटील यांची कन्या या देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आहेत, जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे की संजय दिना पाटील जे आहे ते कालच मुंबईतून दिल्लीला रवाना झालेले होते, मात्र या संदर्भात संजय दिना पाटील यांच्या बरोबर वारंवार संपर्क केला असता त्यांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाहीये, मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे, त्यानुसार संजय दिना पाटील देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, पाटील यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये शुकशुकाट पाहिला मिळतो आहे, नेहमी या ठिकाणी कार्यकर्त्यांची आणि या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असते मात्र आता मात्र मुख्य कार्यालय आहेत तिथे कोणी नाहीये, तर त्यांच्या घरातील कुटुंबीय देखील या ठिकाणी नाहीयेत अशा स्थितीमध्ये खरंतर आज सगळे चित्र जे आहे ते क्लिअर होईल मात्र संजय दिना पाटील यांच्याबरोबर त्यांची कन्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका देखील आहेत त्या पुढे काही निर्णय घेणार का? संजय दिना पाटील हे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर ईशाने मुंबईमध्ये देखील मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

Shivsena UBT MP:  काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. 

Shivsena news:  ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *