Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडून बहुचर्चित ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अखेर यशस्वी करुन दाखवले आहे. ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांनी बुधवारी नवी दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटाची नोंदणी केली. लोकसभा अध्यक्षांनी या सहा बंडखोरांच्या गटाला मंजुरी दिली आहे. हा गट आता लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. येत्या 19 जून रोजी मुंबईत होणाऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात ठाकरे गटाचे सहा बंडखोर खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. (Maharashtra Politics news)
शिंदे गटाने ऑपरेशन टायगर यशस्वी करुन दाखवल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा शिवसेना खिळखिळी केल्यामुळे ठाकरे गटाच्या भविष्यातील अस्तित्त्वाबद्दलच अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानंतर आता आमदार आणि नगरसेवकही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जातील, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी तुमचे मुंबईतील 65 खासदार तुमच्याकडे राहतात का बघा, असा गर्भित इशाराच देऊन टाकला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचे आमदारही फुटणार का, याविषयी तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
Shivsena UBT MLAs: ठाकरे गटाचे 20 आमदार कोण?
1 मेहकर- सिद्धार्थ खरात
2 दर्यापूर – गजानन लवाटे
3 बाळापूर – नितीन देशमुख
4 वणी – संजय देरकर
5 परभणी – राहुल पाटील
6 विक्रोळी – सुनील राऊत
7 जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
8 दिंडोशी – सुनील प्रभू
9 वर्सोवा – हरुन खान
10 कलिना – संजय पोतनीस
11 वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
12 माहीम – महेश सावंत
13 वरळी – आदित्य ठाकरे
14 शिवडी – अजय चौधरी
15 भायखळा – मनोज जामसूतकर
16 खेड आळंदी – बाबाजी काळे
17 उमरगा – प्रवीण स्वामी
18 उस्मानाबाद – कैलास पाटील
19 बार्शी – दिलीप सोपल
20 गुहागर – भास्कर जाधव
आणखी वाचा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद