आदल्या रात्रीच मोठा गेम, ठाकरेंचा व्हीप ठरला अवैध; खासदारांच्या त्या पत्रामुळे…खळबळ उडवून देणारी माहिती समोर! – Marathi News | Sushama andhare said ubt whip is declaired null and void due mp letter to loksabha president


Uddhav Thackeray UBT MP Revolt : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार फुटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे. विशेष म्हणजे या बंडखोर खासदारांच्या वेगळ्या गटाला लोकसभा अध्यक्षांना मंजुरी दिली आहे. आता वेगळ्या गटाला मंजुरी मिळाल्यानंतर आता लवकरच हा खासदारांचा गट थेट उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होणार आहे. त्यानंतर आता या खासदांच्या बंडखोरीची कायदेशीर वैधता काय? ठाकरे गट नेमकी काय कारवाई करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाने जारी केलेला व्हीप अवैध ठरवण्यात आला आहे.

नेमकी काय माहिती समोर आल?

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाती खासदारांच्या बंडखोरीविषयी महत्त्वाची माहिती दिली. बंड केलेल्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जावी, यासाठी आता ठाकरे गटाकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने आज व्हीप जारी केला आहे. या व्हीपमध्ये शर्व खासदारांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ठाकरेंचे खासदार या बैठकीला गैरहजर राहिल्यास पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन मानले जाते आणि त्यानुसार कारवाई केली जाते. परंतु याच व्हीपबाबत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून तशी माहिती समोर आली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना कालच पत्र दिले आहे. त्यांच्या वेगळ्या गटाला मंजुरीदेखील मिळली आहे. ठाकरे यांच्या पक्षातर्फे आज व्हीप जारी करण्यात आला आहे. बंडखोर खासदारांचे पत्र कालच गेल्याने ठाकरे गटाचा व्हीप अवैध ठरवला गेला आहे. ही माहिती खुद्द सुषमा अंधारे यांनीच दिली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *