Anjali Damania: आत्ताच्या घटकेला भाजपनी जो हैदोस घातलाय तो कुठेतरी थांबायला हवा. मी उबाठा गटाची समर्थक नाही, मी फक्त लोकशाहीची समर्थक आहे. कारण तिथल्या मतदारांनी कोणाला मत दिलं होतं? त्यांनी मत दिलं होतं एका चिन्हाला, एका विचारसरणीला आणि त्या खासदारांवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांचं मतदान केलं होतं. असं असताना हे जो फोडाफोडीचं राजकारण चाललंय ते इतके घृणास्पद आहे की जो विश्वास ज्या मतदारांचा होता, त्यावर आघात केलाय आज हे सगळं राजकारण बघून असा आपला आत्मा हदरलाय आणि असं वाटतं कुठेतरी थांबायला हवं, अशी खंत अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या विलंबावर तीव्र नाराजी
त्यांनी सांगितले की, खूप मोठी शोकांतिका आहे आणि मला दुःख वाटतंय की आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाला इतर सगळे केसेस जास्त महत्त्वाचे वाटतात आणि कॉन्स्टिट्युशनला जिकडे चॅलेंज करणारी जिथे एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतेय, असं उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय. तर ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉयड’ (न्यायाला विलंब म्हणजेच न्याय नष्ट करणे) असंच म्हणावंसं वाटतं, असे त्या म्हणाल्या. न्यायव्यवस्था जी कोलमडताना दिसतेय, ती जर परत ठिकाणावर आली नाही, तर याला लोकशाही आपल्याला म्हणताच येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मतदाराचं मत विकलं गेलंय
अंजली दमानिया म्हणाल्या, संजय देशमुख हेमंत पाटील यांच्याविरुद्ध लढले. मतदारांनी ज्या शिंदे गटाच्या खासदाराला नाकारलं, त्याविरुद्ध लढून हा माणूस जिंकला, जो आता शिंदे गटात जातोय. दुसरे भाऊसाहेब वागचौरे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लढले होते. नागेश पाटील हे भाऊराव कदम यांच्याविरुद्ध निवडणूक लढले होते. असं असताना सुद्धा पुन्हा-पुन्हा त्यांनी शिवसेना गट सोडून शिंदे गटात प्रवेश करणं, हा म्हणजे मतदाराचं मत विकलं गेलंय, त्यांचा विश्वास विकला गेलाय एवढंच म्हणावंसं वाटतं.
फडणवीस विरुद्ध अमित शाह कुठे आहे का?
दमानिया यांनी सांगितले की, अचानकपणे सगळे चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीला पोहोचतात, चार्टर्ड फ्लाईटचा खर्च कोणी केला? पब्लिक करा. ओम बिर्ला अचानकपणे रात्रीत दिल्लीत पोहोचतात ते कोणाच्या सांगण्यावरून पोहोचले माहीत नाही. हे सगळे खासदार आत्ताच्या घटकेला आधी अमित शहांची भेट घेऊन मग जाणार आहेत, अमित शहांची भेट घेण्याची गरजच काय जर ते शिंदे गटात जाणार असतील तर? याच्या मागे फडणवीस विरुद्ध अमित शहा कुठे आहे का, अशी शंका येते.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद