Numerology 25 May 2026: मूलांक 1 अती विश्वास घातक, सावध राहा! जाणून घ्या, मूलांक शास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य


Numerology Prediction, 25 May 2026: मूलांक 5, 6, 8 सह या मूलांकासाठी आर्थिक लाभ आणि कौतुकाचे योग तर मूलांक 1, 2 सह या मूलांकासाठी मतभेद आणि अपेक्षाभंगाचे दुःख, मूलांक 3, 7 सह या जातकांसाठी नवीन संधी त्याचा लाभ घ्या. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 01 ते 09 साठी सोमवार कसा आहे?

Numerology 25 May 2026
Ank bhavishya, 25 May 2026: मूलांक 1 अती विश्वास टाळावा, मूलांक 4 अपेक्षा कमी ठेवाव्यात, मूलांक 6 साठी सकारात्मक वातावरण, मूलांक 7 साठी प्रगतीची संधी, चला तर पाहूया मूलांक 01 ते 09 या मूलांकांसाठी सोमवार कसा असेल?

मूलांक 1 – अती विश्वास घातक, सावध राहा

मूलांक 1 - अती विश्वास घातक, सावध राहा

मूलांक 1 असणाऱ्यांनी सोमवारी सावध राहा. एखाद्यावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. नोकरी असो वा व्यवसाय काम पूर्ण होईल पण मेहनत जास्त करावी लागेल. लोखंड-स्टील संदर्भात व्यवसाया करत असाल तर लाभाचे योग आहेत.

मूलांक 2 – घरात वादाची ठिणगी

मूलांक 2 - घरात वादाची ठिणगी

मूलांक 2 साठी सोमवारी कामात उत्साह असेल तसेच जे काम हाती घेणार त्यात यश आहे. खूप दिवसांपासून नोकरी असो वा व्यवसाय कामात समस्या येत होत्या त्या आता कमी होतील. घरात जोडीदारासोबत वादाची शक्यता आहे. मतभेदामुळे गैरसमज वाढतील वेळीच सावध व्हा.

मूलांक 3 – नवीन ओळखी लाभाचे योग

मूलांक 3 - नवीन ओळखी लाभाचे योग

मूलांक 3 साठी काही नवीन ओळखीचा योग आहे त्यामुळे भविष्यात करिअरमध्ये लाभ होऊ शकतो. नातेसंबंधात काही नाराजीचे सुर असतील तर ते कमी करण्यासाठी वेळ चांगली आहे. कामात सावध राहा आणि टीमची मदत घेवून काम पूर्ण करा तर प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल.

मूलांक 4 – अपेक्षा ठेवणे कमी करा

मूलांक 4 - अपेक्षा ठेवणे कमी करा

मूलांक 4 असणाऱ्यांनी इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका त्या पूर्ण होणार नाहीत. काही कारणामुळे मन दुखावणार आहे आणि तुम्ही एकटे आहात असे वाटेल. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची वेळ आहे. घरातील काम तुम्ही पूर्ण कराल त्यामुळे कौतुक होईल

मूलांक 5 – कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत

मूलांक 5 - कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत

मूलांक 5 साठी सोमवार उत्तम कारण थांबलेले पेमेंट मिळणार आहे. नोकरी असो वा व्यवसाय कठोर मेहनत आहे. सरकारी कामे असतील तर आधी पूर्ण करा. संध्याकाळी लाभाचे योग आहेत. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. दानधर्म केल्यामुळे समाधान वाटेल.

मूलांक 6 – ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण

मूलांक 6 - ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण

मूलांक 6 साठी सोमवार सुखसमृद्धी घेवून येत आहे. कामात यश, ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण, काम वेळेत पूर्ण तसेच घरात समाधान यामुळे मन प्रसन्न असेल. कामात फोकस वाढवा म्हणजे चूका होणार नाहीत. तुम्ही जो काही निर्णय घेणार त्यात घरातील मंडळींची साथ असेल.

मूलांक 7 – व्यवसायात प्रयत्न वाढवा

मूलांक 7 - व्यवसायात प्रयत्न वाढवा

मूलांक 7 साठी सोमवार ठिक आहे कारण काही कारणाने काम बिघडले होते किंवा प्रोजेक्टमध्ये काही त्रुटी होत्या त्या सुधारण्याची संधी मिळेल. थांबलेले काम पुन्हा सुरु होईल. प्रयत्नांचा वेग वाढवा म्हणजे व्यवसायात उत्तम प्रगती होईल.

मूलांक 8 – शिक्षणासाठी सकारात्मक योग

मूलांक 8 - शिक्षणासाठी सकारात्मक योग

मूलांक 8 असणाऱ्यांनी काही नवीन कोर्स किंवा शिक्षण घ्यायचे ठरवले असेल तर त्यात सकारात्मक योग आहेत. व्यवसायात फोकस आणि कामगार वर्ग वाढवायला हवा कारण येत्या काळात नवीन डिल होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग असून नोकरीत काम वाढेल पण तुम्ही वेळेनुसार नियोजन केले तर कामात यश आहे.

मूलांक 9 – वरिष्ठ कौतुक करणार

मूलांक 9 - वरिष्ठ कौतुक करणार

मूलांक 9 साठी जास्त मेहनत असली तर कामात यश आहे. प्रोजेक्ट वेळेत आणि उत्तम प्रकारे पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ कौतुक करतील. तुमचे बोलणे मान्य केले जाईल. सहकारी तुम्हाला मदत करतील. दानधर्म करण्याचा योग आहे त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. समस्या कमी होणार असून, जे काही मिळवायचे आहे ते लवकरच मिळेल असे संकेत मिळतील.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा