काय पोलीस बनणार तुम्ही? देवीचा मुकुट 12 जूनला शोधून परत दिला अन् त्याच रात्री चोरांनी चोरून नेला! | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

तळेगावमधील तुळजाभवानी मातेचा सव्वा किलो वजनाचा चांदीचा मुकुट मागील २० दिवसांपूर्वी चोरीला गेला होता.

News18
News18

तळेगाव : पुणे जिल्ह्यांमध्ये चोरी, खून आणि गोळीबाराच्या घटना काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे पोलिसांचा धाक आहे की नाही, असा प्रश्न कायम उपस्थितीत झाला पण, असा प्रश्न विचारूनही पोलीस प्रशासनाला काहीच फरक पडत नाही. आता तर पोलिसांचीच चोरट्याने उघडपणे थट्टा उडवली आहे. तळेगाव दाभाडे भागातील तुळजाभवानी मंदिरामध्ये मुकुट चोरीला गेला होता. पोलिसांनी तो शोधूनही आणला. पण, पुन्हा २४ तासांमध्ये चोरट्याने मुकुट चोरून पोलिसांनाच वाकुल्या दाखवल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलिसांनी २० दिवसा पूर्वी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला होता. पण त्याच  रात्री चोरट्यांनी पुन्हा तोचं चांदीचा मुकुट लंपास केला. त्यामुळे चोरट्यांमध्ये कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालाय.

सव्वा किलो वजनाचा चांदीचा मुकुट

तळेगावमधील तुळजाभवानी मातेचा सव्वा किलो वजनाचा चांदीचा मुकुट मागील २० दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. धक्कादायक म्हणजे, पुजाऱ्या देखत मुकुट लंपास झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्र फिरवली. सगळीकडे तपास केला आणि मुकुट चोरी करणाऱ्या दोन चोरांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी मुकुट शोधून आणल्यामुळे मंदिर समितीने पोलिसांच्या आभार मानले.

पोलिसांनी मुकुट केला परत अन् चोराने रात्रीच पळवला

12 जून रोजी सकाळी  तळेगाव दाभाडे पोलिसांनी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी पोलिसांनी मोठा गाजावाजा केला. पण २४ तास उलटायच्या आत ३ चोरट्यांनी पुन्हा त्याचं चांदीच्या मुकुटावर डल्ला मारला.  13 जूनच्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ३ चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. पैशांची दानपेटी फोडली आणि देवीचा मुकुट आरामात घेऊन पळून गेले. विशेष म्हणजे, सीसीटीव्हीच्या समोरच चोरांनी कोणतीही भीती न बाळगता अवघ्या ६ मिनिटांमध्ये चोरी केली.

आता महिन्याभरात दोनदा एकाच मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेनं तळेगावकर भयभीत झाले आहेत. मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या संपूर्ण घटनेतील ३ चोरांचा शोध घेत आहेत. आता पोलीस मुकुट शोधून आणतील का, असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/

काय पोलीस बनणार तुम्ही? देवीचा मुकुट 12 जूनला शोधून परत दिला अन् त्याच रात्री चोरांनी चोरून नेला!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *