Saksham Tate Death Case: सासर सोडण्यामागचं खरं कारण समोर! आंचल मामिडवारचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; ट्रोलर्सनाही दिले उत्तर, आईच्या आरोपावर म्हणाली…


नांदेड : नांदेडच्या इतवारा परिसरात ६ महिन्यांपूर्वी सक्षम ताटे याची प्रेमप्रकरणातून गोळ्या घालून आणि डोक्यात फरशीने वार करून हत्या करण्यात आली होती. आंचल मामीडवार या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. हेच प्रेमसंबंध (Saksham Tate Death Case) आंचलच्या घरी मान्य नव्हते. आंचलचे भाऊ, वडील आणि इतर सहकाऱ्यांनी सक्षमला एकट्याला गाठून त्याला संपवले होते. त्यानंतर आंचलने घरच्यांच्या विरोधात जाऊन, प्रसंगी पोलिसांत साक्ष (Saksham Tate Death Case) देऊन घरच्यांवर गुन्हा दाखल केला होता. सक्षमच्या मृतदेहाबरोबर लग्न करून संपूर्ण आयुष्य आता सक्षमच्या घरीच राहणार असल्याचे तिनं सांगितलं, मात्र अवघ्या काही महिन्यातच आंचल आमच्या घरातून निघून गेल्याचे सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर ती घर सोडून का गेली, अशा चर्चा रंगल्या होत्या आता याच पार्श्वभूमीवर आंचल मामिडवारने प्रसार माध्यमांच्या समोर येऊन नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.(Saksham Tate Death Case)

Nanded Anchal Mamidwar Case: सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता…

नांदेडमधील सक्षम ताटेच्या आईने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, आंचलने आजीकडे जायचा बहाणा करून घर सोडले, ती परत आली नाही. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सक्षमची आई संगीता ताटे यांनी हा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला आंचल मामिडवार हिने उत्तर दिले आहे. सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता, म्हणून सगळ्यांना सांगून घर सोडले, असे आंचलने सांगितले.

Nanded Anchal Mamidwar Case: आंचल पहिल्यांदाच समोर, सक्षमच्या भावावर आरोप करत म्हणाली…

सक्षमच्या आईने सांगितलेल्या सर्व गोष्टीवर उत्तर देत आंचल मामिडवार म्हणाली, सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याने आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप तिने केला . ही बाब मी सक्षमच्या कुटुंबाला सांगितली मात्र त्यांनी विश्वास ठेवला नाही. पुढे काही चुकीचे घडले तरी सक्षमचे कुटुंबीय विश्वास करणार नाहीत म्हणून मी सर्वांना सांगून, पोलिसांना कल्पना देऊन घर सोडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः सोबत येऊन मला माझ्या वडिलांच्या घरी सोडले. सध्या मी वडिलांच्या घरी राहत असल्याचे आंचलने यावेळी सांगितले.

त्याचबरोबर सक्षमच्या वडिलांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचेही तिने सांगितले. तिने सक्षमचे घर सोडल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर पसरल्या. त्यावरुन आंचलला ट्रोल केले जात आहे. समाजमाध्यमांवर तिच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. या टीका टिप्पणींबाबत तिने नाराजी व्यक्त केली. सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करू नये, असे आवाहनही आंचलने केले आहे. यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Nanded Anchal Mamidwar Case: सक्षमच्या आईने काय म्हटलं होतं?

संगीता ताटे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, धाकटा मुलगा नाशिकमध्ये शिक्षण घेत आहे. आता घरात मी एकटीच राहिले आहे. मुलाची प्रेयसी माझ्याच घरी राहत होती पण काही महिन्यात ती माहेरी परत गेली होती. सक्षमच्या जागी आता मी तुमचा मुलगा आहे. तुमच्यासोबत राहीन, तुमची काळजी घेईन असं ती सक्षमच्या जाण्यांतर म्हणाली होती. ती तीन महिने सोबत राहिली, एक दिवस म्हणाली आजीची तब्येत खूप खराब झाली आहे. मला त्यांना भेटायला जायचे आहे. इथून काही अंतरावर तिचं घर आहे. मी तिला पोहोचवून  आले. त्यानंतर ती कधीच परत आली नाही, असं सक्षमच्या आईने सांगितलं.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *