Shani Vakri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिला (Shani Dev) न्यायदेवता देखील म्हटलं जातं. मान्यतेनुसार, शनि प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ देतो. सध्या शनि मीन राशीत संक्रमण करतोय. तो जून 2027 पर्यंत याच राशी स्थित असणार आहे. शनिचं हे संक्रमण सर्व राशींवर प्रभाव पाडणार आहे. मात्र, काही राशींसाठी हा काळ फार भाग्यशाली ठरणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी येणार काळ फार भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. कामाच्या काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनिचं हे संक्रमण लाभदायी ठरणार आहे. जर तुमची अनेक दिवसांपासून साडेसाती सुरु आहे. तर, या काळात तुम्हाला समाधान मिळू शकतं. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. अनेक नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत सकारात्मक निर्णय लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. समाजात चांगला मान-सन्मान मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभदायक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. नोकरदार वर्गासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. भविष्याच्या संदर्भात तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी ठरतील. अनेक नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींच्या श्रीमंतीचा हाच योग! जूनचा तिसरा आठवडा पॉवरफुल, साप्ताहिक राशीभविष्य
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!