कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये मराठी कलाकारांची उपस्थिती हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.या ग्लोबल रेड कार्पेटवर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांनी पती अशोक सराफ यांच्यासोबत पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये हजेरी लावली आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटो तुफान व्हायरल झाले.पण या लूकबाबत चाहत्यांमध्ये एक प्रश्न मात्र सतत चर्चेत आहे. “एकाच गोष्टीची अतिरेक नको ” असा प्रश्न चाहत्यांना पडला.

काहींनी त्यांचे कौतुक केले, तर काहींनी प्रश्न उपस्थित केला कान्समध्ये फक्त एकाच फॅब्रिकचे प्रमोशन का करत आहेत. पैठणी महाराष्ट्राचे महावस्त्र आहे ही गोष्ट मान्य पण खादी, सुती कापड सुद्धा परिधान करू शकता कोणत्याही गोष्टीची अतिरेक नको असे मत चाहत्यांनी वक्त केले. (फोटो सौजन्य :- @nivedita_ashok_saraf)
पारंपरिकतेचा अभिमान पैंठणीचा झळाळता लुक
निवेदिता सराफ यांनी या प्रसंगी पारंपरिक मराठी पेहराव निवडला होता.त्यांनी सिंपल ग्रे रंगाचा स्लीक ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे एक मॉडर्न बेस तयार झाला. त्या बेसवर त्यांनी पैंठणीच्या फॅब्रिकची सुंदर ओढणी घेतली होती. या ओढणीमुळे त्यांच्या संपूर्ण लूकला पारंपरिकतेची झळाळी आणि मराठमोळा ठसा मिळाला. या ओढणीवर पैंठणीचे खास सोनसळी नक्षीकाम दिसत होते, जे महाराष्ट्राच्या समृद्ध विणकाम परंपरेचं प्रतीक मानलं जातं.
साधेपणा आणि राजेशाही यांचा अनोखा संगम त्यांच्या या लूकमध्ये स्पष्टपणे दिसून येत होता. त्यांनी हा लूक पूर्ण करण्यासाठी पैंठणीच्या कापडापासून तयार केलेली आकर्षक पर्सही कॅरी केली होती. ही पर्स केवळ एक अॅक्सेसरी नव्हती, तर संपूर्ण थीमला जोडणारा महत्त्वाचा भाग होता. ओढणी आणि पर्समध्ये असलेली फॅब्रिकची एकसारखी झलक त्यांच्या लूकला एकसंध आणि विचारपूर्वक तयार केलेला फिनिश देत होती.
पैठणी पर्स डिझाईनिवेदिता सराफ यांचे मंगळसूत्र डिझाईन
निवेदिता सराफ यांचे मंगळसूत्र डिझाईन पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा सुंदर संगम आहे. त्यात साधारणपणे बारीक सोन्याची साखळी, काळ्या मण्यांची पारंपरिक ओळ आणि मध्यभागी मिनिमल किंवा फ्लोरल डिझाईनचे हलके पेंडंट असते. जड डिझाईन टाळून ते रोज वापरता येईल असे एलिगंट आणि सोपे ठेवले जाते, त्यामुळे ते पारंपरिक लुकसोबत आधुनिक फॅशनलाही सहज सूट होते.
कमीत कमी दागिन्यांनी पूर्ण केला लुक
निवेदिता सराफ यांनी या लूकमध्ये दागिन्यांचा अतिशय मर्यादित आणि सुटसुटीत वापर केला होता. ओव्हर-डेकोरेटेड ज्वेलरीऐवजी त्यांनी मिनिमल आणि एलिगंट दागिने निवडले, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण लूक अधिक नैसर्गिक आणि सोज्वळ दिसत होता. त्यांनी साधे मंगळसूत्र, हलक्याशा सोन्याच्या किंवा मोत्यांच्या बांगड्या आणि कानातले परिधान केले होते.
चाहत्यांच्या कमेंट्स
निवेदिता अशोक सराफ यांचा कान्समधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटल्या. त्यांच्या पारंपरिक आणि मिनिमल फॅशन निवडीमुळे अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिले की, “मराठी संस्कृतीला जागतिक मंचावर नेणं ही अभिमानाची गोष्ट आहे”, तर काहींनी “पैंठणीचा लूक खूपच एलिगंट आणि क्लासिक दिसतो” असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे पैठणीचा अतिरेक झाला असे म्हणले आहे.
चाहत्यांच्या कमेंट्स
निवेदिता अशोक सराफ यांचा कान्समधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटल्या. त्यांच्या पारंपरिक आणि मिनिमल फॅशन निवडीमुळे अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिले की, “मराठी संस्कृतीला जागतिक मंचावर नेणं ही अभिमानाची गोष्ट आहे”, तर काहींनी “पैंठणीचा लूक खूपच एलिगंट आणि क्लासिक दिसतो” असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे पैठणीचा अतिरेक झाला असे म्हणले आहे.
