Prajakta Mali New South Film: मालिका, सिनेमा अन् रिअॅलिटी शोजमध्ये सूत्रसंचासलन केल्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) आपल्या नव्या पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री लवकरच दाक्षिणात्य सिनेमात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राजक्ता लवकरच तेलुगु सिनेमात झळकणार असून, हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या बातमीमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना आंनद झाला असून, प्राजक्ताची नेमकी कोणती भूमिका असणार? अभिनेत्री कोणत्या कलाकारासोबत झळकणार? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
प्राजक्ता माळीची साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्री (Prajakta Mali South Industry Entry)
मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर अभिनेत्री लवकरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत मराठी मालिका, सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिनं उद्योगातही आपलं नाव कमावलं आहे. अभिनेत्रीनं मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अभिनेत्री आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यास सज्ज झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्राजक्ता माळी लवकरच तेलुगू सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात नेमके कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, प्राजक्ता माळीची या सिनेमात कोणती भूमिका असणार? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तिचा हा आगामी तेलुगू सिनेमा याच वर्षी रिलीज होणार असल्याची माहिती आहे.
प्राजक्ता माळीच्या चाहत्यांना आनंद (Prajakta Mali Set For Telegu Film Debut)
तिच्या आगामी सिनेमाविषयी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या दाक्षिणात्य सिनेमात तिचा लूक नेमका कसा असेल? ती कोणत्या दाक्षिणात्य कलाकारासोबत स्क्रीन शेअर करणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, तिचा आगामी दाक्षिणात्य सिनेमा अभिनेत्रीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरेल का? हे लवकरच समोर येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
“370 रुपयांची बिर्याणी” पडली महागात, प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती? एका शोमधून किती कमावतो?
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष