Jain Community Dharm Sabha: मुंबईतील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयावरून जैन समाजाने जन कल्याण पार्टीची घोषणा केली आहे. या पक्षाचे चिन्ह कबुतर असेल आणि ते महापालिकेत उमेदवार उभे करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी कबुतर खाण्यांचा विषय सध्या जोर धरू लागला आहे. मुंबईमध्ये यावरून मोठ आंदोलनही झालं होतं. जैन धर्मियांनी कबुतरखाना बंद होऊ नये, अशी भूमिका घेतली होती. दरम्यान न्यायालयानं मुंबईतला कबुतरखाना बंद राहणार असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाला आहे व त्यांच्या आत्मशांतीसाठी आज मुंबईत जैन समाजाकडून धर्मसभा भरवली गेली होती. या सभेमध्ये जैनधर्मिय मुनींनी एक पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. भाजपचं मोठं बलिदान, ‘मोदींच्या हनुमाना’चाही सन्मान; बिहारसाठी NDAचं जागावाटप ठरलं; भाजप लहान भाऊ
जैनमुनी निलेशचंद्र विजय म्हणाले…
सनातनधर्मातर्फे मी इशारा देत आहे. महाराष्ट्रातले मराठी लोक कबुतरांना विरोध करत नाहीय. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी कबुतरांचा प्रश्न निर्माण केला आहे. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही. जैन धर्मातली लोक सर्वाधिक कर भरतात. आता आमचाही पक्ष असेल. आम्हीदेखील महापालिकेत आमचे उमेदवार उभे करणार आहोत. कबुतरांची पार्टी पाहिजे. शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत असताना निलेश मुनींनी जन कल्याण पार्टी या पक्षाची घोषणाच केली आहे. पक्षाचं चिन्ह कबुतर असेन, असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती मारवाडींची पार्टी, तसेच आमच्या जन कल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री असल्याचं निलेशचंद्र विजय म्हणालेत.
कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं होतं. कबुतरांमुळे महायुतीचं सरकार कोसळेलं असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांना उद्देशून “त्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत, त्यांना आवरा” असं निलेश मुनीनीं थेट एकनाथ शिंदेंना सुचित केलं आहे.
धक्कादायक वक्तव्य
दरम्यान, या धर्मसभेमध्ये जैनमुनी कैवल्यरत्न महाराज यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की कबुतर शांत प्राणी आहे. आमचा धर्म दुसऱ्यासाठी मरायची शिकवण देतो. रावणासमोर जटायू पक्षी आलेला. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे सर्वांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रारामाने एवढं केलं आहे. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको. इथले डॉक्टरकर मूर्ख आहेत. एक दोनजण मेल्यानं काय होतं? दररोज सामान्य माणूस मरतो. त्याचा विचार सरकार करत नाही. असं धक्कादायक वक्तव्य या महाराजांनी केलं आहे.
अनिल परब, उदय सामंत, संजय शिरसाट एकाच लिफ्टमध्ये, ठाकरे-शिंदेंचे नेते आमनेसामने!
मंत्री भाजप आमदार मंगल प्रभात लोढा या धर्मसभेला उपस्थित राहिले नाही यावरुन ही सगळी सरकारची मिलीभगत असल्याचा दावाही यावेळी या जैनमुनींनी केला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा