Numerology: लग्नानंतर खरा जॅकपॉट! ‘या’ जन्मतारखांचं नशीब विवाहानंतर पालटते, ‘या’ वयात टर्निंग पॉईंट, केतूचा मोठा गेम, अंकशास्त्र..


Numerology: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो, आपण नेहमी ऐकत आलो आहोत, की लग्न म्हणजे एक प्रकारे लॉटरीच असते, ज्याला लागली, त्याचे नशीब सोन्यासारखे उजळते. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यापैकी काही लोकांचं नशीब हे लग्नानंतर उजळतं, त्यांना एकप्रकारे जॅकपॉटच लागतो असे म्हणता येईल, अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याच्या जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल जाणून घेता येते. अंकशास्त्रात अशा लोकांचे वर्णन करण्यात आले आहे, ज्यांचे जीवन लग्नानंतर बदलते. त्यांचे नशीब अचानक बदलते.. जाणून घेऊया त्या जन्मतारखांबद्दल…

‘या’ जन्मतारखेच्या लोकांच्या जीवनात लग्नानंतर अचानक बदल होतो…(Numerology)

अंकशास्त्रानुसार, आपण ज्या जन्मतारखेच्या लोकांबद्दल बोलत आहोत. त्या जन्मतारखा म्हणजे, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झाला असेल, त्या लोकांचा मूलांक 7 असतो, या लोकांच्या जीवनात लग्नानंतर अचानक बदल होतो. त्यांचे भाग्य उजळते. या लोकांना लग्नानंतर खूप भाग्य लाभते.  केतू हा 7 मूलांक असलेल्यांचा स्वामी ग्रह आहे. केतूच्या प्रभावाखाली, हे लोक रहस्यमय, आध्यात्मिक आणि बुद्धिमान असतात. केतू हा भगवान गणेशाशी संबंधित आहे आणि गणेश त्यांना विशेष आशीर्वाद देतो.

लग्नापूर्वी संघर्ष… लग्नानंतर खरा जॅकपॉट?

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेल्या लोकांना जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. लग्नापूर्वी, त्यांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात अडथळे येतात. आर्थिक परिस्थितीत अनेकदा चढ-उतार होतात. केतू ग्रहाच्या प्रभावामुळे अनपेक्षित घटना घडतात. मात्र, लग्नानंतर या लोकांचे आयुष्य बदलते आणि त्यांना यश मिळते. लग्नानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. लग्नानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. त्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी होतात. जीवन समृद्ध होते. प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात. ज्यांचा अंक 7 आहे, त्यांच्यासाठी लग्न हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांचा अंत होतो.

करिअर आणि वैवाहिक जीवन

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेल्या लोकांचे करिअर खूप चांगले असते. ते लेखन, अध्यात्म आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतात. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते. त्यांचा जोडीदार त्यांच्या भावना समजून घेतो, ज्यामुळे नात्यात स्थिरता आणि आनंद येतो. त्यांचा संबंध केतू ग्रहाशी आहे. त्यांनी भगवान गणेशाची पूजा करावी आणि ‘ओं गं गणपतये नमः’ व ‘ओम कें केतवे नमः’ या मंत्रांचा जप करावा…

हेही वाचा

Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी, जून-डिसेंबर 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर! ‘या’ महिन्यात टर्निंग पॉईंट…थक्क..

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *