Horoscope Today 18 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 18 जुलै 2026, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस हा शनिदेवांना तसेच भगवान हनुमंतांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिकृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत दाखवून द्याल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैसा मिळाला तरी त्याला अनेक वाटा फुटतील, तुमच्या बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक घडी चांगली बसेल, परंतु पैशाला अनेक वाटा असल्यामुळे जवळ शिल्लक मात्र राहणार नाही
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्यांचे नवीन लग्न ठरले आहे, त्यांनी बोलण्यावर ताबा ठेवावा, कुटुंबामध्ये मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील, महिला उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण करतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमचा मूड कधी जाईल आणि कधी चिडाल याचा भरोसा राहणार नाही, मुलांच्या भन्नाट कल्पनांमुळे थक्क व्हाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुटुंबातील नातेवाईकांच्या विचित्र वागण्यामुळे त्रस्त व्हाल, तुमच्या बोलण्यामध्ये एका वाक्यता राहणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दिलेला शब्द जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा, व्यवसायात कामाचे पैसे मिळण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावंडांशी न पटल्यामुळे ताण-तणाव वाढतील, कामांमध्ये नाकापेक्षा मोती जड होता उपयोगाचा नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला क्षुल्लक कारणावरून चिडचिड करतील, तुमच्यातील जिद्द कामाची शिस्त आणि धडाडी वाखाणण्याजोगी असेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर असतील, त्याप्रमाणे नियोजनही कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानापमानाच्या कल्पना जरा टोकदार होतील, त्यामुळे स्वतःहून कोणाकडेही कसलीही याचना करणार नाही
हेही वाचा :
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी जुलैचा पुढचा आठवडा नशीब पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)