Divyanka Tripathi Gave Birth To Twins: लग्नानंतर 10 वर्षांनी आई झाली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री; 41 व्या वर्षी दिला जुळ्या मुलांना जन्म; म्हणाली..


Divyanka Tripathi Gave Birth To Twins: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) लग्नाच्या तब्बल 10 वर्षांनंतर आई झाली आहे. मंगळवारी तिने मुंबईत जुळ्या मुलांना जन्म दिला. अभिनेत्री आणि तिचा पती विवेक दहिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

दिव्यांका आणि विवेक यांनी अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं, “अखेर प्रतीक्षा संपली… आमची बाळ आले आहेत आणि आयुष्य आता आम्ही कल्पना केली त्यापेक्षाही अधिक सुंदर वाटत आहे. माझे करण-अर्जुन आले!” पुढे त्यांनी लिहिलं, “दिव्यांका आणि मी आयुष्यातील या सुंदर पालकत्वाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. ” शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिलं होतं, “आम्ही आनंद मागितला होता… आणि देव म्हणाला, “दुप्पट घेऊन जा.” आमच्या घरी जुळ्या गोंडस मुलांचं आगमन झालं आहे.”

मार्चमध्ये केली होती प्रेग्नन्सीची घोषणा

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाने मार्च महिन्यात चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. अभिनेत्रीने बेबी बंपचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, “10 वर्षांनंतर आमच्या कथेतला सर्वात सुंदर ट्विस्ट आला आहे. काही प्रवास लवकर पूर्ण करण्यासाठी नसतात, तर एकत्र तयार होण्यासाठी असतात. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमची कथा पूर्ण झाली आहे, तेव्हाच आयुष्य त्यात सर्वात सुंदर अध्याय जोडतं. अजूनही विश्वास बसत नाही. विनाकारण हसू येतंय. मनात फक्त कृतज्ञता आणि आनंद आहे. आम्ही आई-बाबा होणार आहोत.”

 

टीव्ही शोच्या सेटवर प्रेमात पडले

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाची पहिली भेट ‘ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघेही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत होते. एकत्र काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि जानेवारी 2016 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत, जुलै 2016 मध्ये भोपालमध्ये दोघांचं लग्न पार पडलं. दिव्यांकाला ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेमधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ‘ये है मोहब्बतें’मधून ती घराघरात पोहोचली. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त दिव्यांका अनेक रिअॅलिटी शो, वेब सिरीज आणि चित्रपटांचाही भाग राहिली आहे.

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *