बाळाचा चेहरा पाहणं राहूनच गेलं! पाळणा हलण्याआधी चिता पेटली; तरुण पोलीसाचा दुर्दैवी अंत | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Shocking Incident : घरात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. कुटुंब आनंदाच्या क्षणांची वाट पाहत असतानाच अचानक काळाने घाला घातला. काही क्षणांतच आनंदाचं वातावरण दुःखात बदललं आणि कुटुंबावर कधीही न भरून येणारा आघात झाला.

पोलीस जवानाच्या निधनाने कुटुंबाचा आधारच हरपला
पोलीस जवानाच्या निधनाने कुटुंबाचा आधारच हरपला

कर्जत : घरात लवकरच पाळणा हलणार होता याची चाहूल लागल्याने एकीकडे घरात आनंदाचे वातावरण होते. भविष्यातील सुखद स्वप्न पाहत असतानाचा रात्री अचानकच घडलेल्या एका भीषण घटनेने सर्व स्वप्न क्षणात उद्ध्वस्त केले. एक सुखद बातमी ऐकण्यापूर्वीच कुटुंबावर काळाने असा क्रुर घाला घातला की प्रत्येकाचे डोळे पाणावले.

घरात बाळाच्या आगमनाची चाहूल

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 26 वर्षीय तरुण पोलीस जवानाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ऋतिक किसन ढोले असे मृत जवानाचे नाव असून त्यांच्या मृत्यूने कर्जत परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एक धक्कादायक गोष्ट म्हणजे काही काळापूर्वी लग्न झाले असून त्यांची पत्नी गरोदर असताना ही घटना घडली असल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमके काय घडले?

ऋतिक ढोले हे आपल्या चार मित्रांसोबत कारने कळंब या ठिकाणाहून चाहूचीवाडी येथील त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. या प्रवासत कार स्वत:ऋतिक चालवत होते. नेमके रात्रीच्या वेळी कर्जत-मुरबाड महामार्गावर कळंब-चाहूचीवाडी गावाजवळ एका धोकादायक वळण आले आणि ऋतिक यांचा कारवरील ताबा सुटला. भरधाव वेगात असलेली कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक रेलिंगवर अतिशय जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की, कारचा एक भाग अक्षरश: हवेत उडाला असून कारचा चक्काचूर झाला.

भीषण अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व कारमधील जखमींना बाहेर काढले आणि भिवपुरी येथील रुग्णालयात तातडीने दाखल केल. पण दुर्दैवाने ऋतिक ढोले यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर अपघातातील अन्य चार मित्र जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

काही महिन्यांपूर्वीच लग्न

ऋतिक यांच्या वडिलांचेही अवघ्या दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वार ऋतिक यांना महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी मिळाली होती. सध्याच्या स्थितीला ते श्रीवर्धन ठाण्यात सेवा बजावत होते. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ऋतिक यांचे काही महिन्यापूर्वी लग्न झाले असून त्यांची पत्नीही गरोदर होती. नव्या बाळाचे तोंड पाहण्यापूर्वीच वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने प्रत्येकजण हळहळला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

बाळाचा चेहरा पाहणं राहूनच गेलं! पाळणा हलण्याआधी चिता पेटली; तरुण पोलीसाचा दुर्दैवी अंत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *