Nitesh Rane: आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यामध्ये सचिन अहिराचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना वरळीचा चांगला अभ्यास असल्यामुळे, आणि सचिन अहिरेंशिवाय वरळीचा आमदार कोण होऊच शकत नाही, एवढी तरी माहिती आमच्याकडे असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यात कमी पडले अशी टीका केल्यानंतर राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांच्यावर टीकाटिपणी करत असतील तर
नितेश राणे म्हणाले की, आता तो त्यांना (सचिन अहिर) अनुभव आला आहे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल. आम्ही तर नेहमी टीकाकार आहोत. पारंपारिक विरोधक म्हणून आम्हाला बघितलं जातं, पण आज त्यांच्याच खांद्याला खांदा लावून लावणारे, त्यांच्याबरोबर एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे त्यांच्यावर टीकाटिपणी करत असतील तर आलेल्या अनुभवापोटी सचिन अहिजी बोलत आहेत. आज महाराष्ट्राला कळलं पाहिजे की नितेश राणे जे बोलत होते ते सत्य होत असताना दिसत आहे.
विश्वास ठेवण्यापेक्षा पुरावे द्यावेत
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआचा आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटींची ऑफर आल्याचा दावा केला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, कुठल्याही आरोपांवर उत्तर देऊ नये. आमदार सुनील राऊत शिंदे सेनेत प्रवेश करणार अस आम्ही म्हटलं तर विश्वास ठेवू शकतो का? संजय राऊत काय आरोप करतात यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पुरावे द्यावेत.
देवगडमध्ये कुठलाही अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही
नितेश राणे यांनी सांगितले की, देवगडमध्ये कुठलाही अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं. कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाला हानी करणारे प्रकल्प येणार नाही. राणे द्वेष असल्यामुळे विरोधक प्रत्येक प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, आमचा जो तरुण आज मुंबई, पुणे, नाशिक, गोव्याकडे गेला आहे त्याला परत आणणं हा कळीचा मुद्दा आहे. कुठलाही प्रकल्प तुम्ही विरोध करायला जाता, पण त्या प्रकल्पाचा विरोध करत असताना तुम्ही आमच्या सिंधुदुर्गची प्रतिमा, देवगडची प्रतिमा पण खराब करताय. उद्या गुंतवणूकदार काय विचार करणार इथे आंदोलनं होतात, आम्ही गुंतवणूक करणार नाही अशी भूमिका गुंतवणूकदार ठेवतात. म्हणून पर्यावरणाला हानी असलेले प्रकल्प आम्ही आणणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर