ईशा मालवीयचा ‘गुलाबी साडी’वर धमाकेदार डान्स; रितेश देशमुखही फिदा! – Marathi News | Isha malviya dance on gulabi saree in pink saree riteish deshmukh reacts watch


मराठमोळा गायक संजू राठोडने नुकतंच बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल टाकलं आहे. त्याच्या आवाजातील ‘गुलाबी साडी’ हे गाणं मराठीत तुफान गाजलं. या गाण्यावर सोशल मीडियावर असंख्य रील्स बनवण्यात आले. यात सेलिब्रिटीही मागे नव्हते. आता याच गाण्याचं हिंदी व्हर्जन बॉलिवूड चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘धमाल 4’ या चित्रपटात संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’चं नवीन व्हर्जन असून अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री अंजली आनंद यांच्यावर हे जबरदस्त गाणं चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यावर नाचण्याचा मोह ‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्री ईशा मालवीयलाही आवरला नाही. गुलाबी साडी नेसून तिने या गाण्यावर धमाल डान्सचा रील व्हिडीओ बनवला आहे. त्यावर रितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे.

ईशा मालवीय विविध गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचे हे व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. इतकंच नव्हे तर संजू राठोडच्या ‘लाल बांगडी’ या म्युझिक अल्बममध्येही ती झळकली होती. संजू राठोडच्या गाण्यांची मोठी चाहती असलेल्या ईशाने त्याच्या या नवीन गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. रितेश देशमुखनेही तिच्या व्हिडीओला लाईक केलं आहे. अवघ्या 20 तासांत ईशा मालवीयच्या या डान्स व्हिडीओवर साडेपाच लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स आहेत.

पहा व्हिडीओ-

‘धमाल 4’ हा ‘धमाल’ फ्रँचाइजीमधला चौथा भाग आहे. येत्या 10 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर यांच्या भूमिका आहेत.  या चित्रपटातील ‘साडी’ या गाण्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हे गाणंसुद्धा मराठी व्हर्जनइतकंच लोकप्रिय होण्याच्या मार्गावर आहे.

काही दिवसांपूर्वीच ईशाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीशी हस्तांदोलन करताना, त्यांच्याशी बोलताना दिसली. ईशा त्या व्यक्तीला पंतप्रधान मोदीच समजून बसली आणि तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिची खूप खिल्ली उडवली होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *