संजय राऊत यांच्या 20 कोटींच्या ऑफरच्या दाव्यावर थेट आमदार धीरज लिंवाडे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट.. – Marathi News | MLA Dheeraj Lingade has made major revelation regarding Sanjay Raut’s offer of 20 crore


राज्यात 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यानंतर एक आमदारही ठाकरे गटातून फुटला. शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी सुरू असून काही आमदार एकनाथ शिंंदेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले जातंय. ही बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट येत्या मंगळवारी मातोश्रीवर बैठक बोलवली. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आमदार खासदार फुटण्याचे सत्र सुरूच आहे. राज्यात अजूनही ऑपरेशन टायगर सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा मोठा धक्का बसू शकतो. 6 खासदार फोडून मोठा धक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अगोदरच दिला. त्यामध्येच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठा भूकंप राज्याच्या राजकारणात आला.

संजय राऊत यांनी म्हटले की, लिंगाडे नावाच्या आमदाराला 20 कोटींची ऑफर दिली आहे. माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला. संजय राऊत यांनी थेट आमदार धीरज लिंगाडे यांना 20 कोटीची ऑफर दिल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली. आमदार धीरज लिंगाडे हे काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत, त्याच्याबद्दल राऊतांनी दावा केला.

संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना आमदार धीरज लिंगाडे यांनी म्हटले की, धीरज लिंगाडे यांनी म्हटले की, मला याबाबत आज सकाळी समजले. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्याच्या विधानाचे मला आश्चर्य वाटते. ते जे काही बोलले ते पूर्णपणे खोटे आहे. मला अशी कोणतीही ऑफर आली नाही. माझ्या संदर्भात जो काही दावा करण्यात आला तो खोटा आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आली नाही.

मी रूग्णालयात देखील भरती नाही, असे स्पष्ट शब्दात धीरज लिंगाडे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. राऊतांच्या दाव्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन थेट आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटानंतर काँग्रेसमध्येही बंडखोरी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आमदार धीरज लिंगाडे यांनी अशी कोणताही ऑफर नसल्याचे स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *