Mumbai Pune Missing Link Land Slide: मिसिंग लिंकच्या खड्ड्यांवर देवेंद्र फडणवीसांनी इंजिनिअरिंग टेक्निक सांगितली, आता दरड कोसळताच रोहित पवारांनी कोंडीत पकडलं, म्हणाले….


Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित अशा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. 1 मे रोजी जागतिक दर्जाचा दावा करत महायुती सरकारने मोठ्या थाटात याचे उद्घाटन केले होते, मात्र अवघ्या दोन महिन्यांतच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच या नव्याकोऱ्या मार्गावर खड्डे पडल्याचे समोर आले होते, यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणतेही मोठे काम पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला पाऊस पडल्यानंतर रस्त्याची टिकाऊ क्षमता तपासली जाते. त्या काळात काही तांत्रिक बाबी समोर येतात आणि त्यानुसार आवश्यक दुरुस्ती केली जाते, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, हा वाद सुरू असतानाच सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ थेट मोठा स्लॅब कोसळल्याची (Slab Collapse) गंभीर घटना घडली. छतामधून डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा थेट रस्त्यावर आल्याने सध्या येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. 

Mumbai Pune Missing Link Land Slide: नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार,” अशी टीका त्यांनी केलीय. 

Mumbai Pune Missing Link Land Slide: काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मिसिंग लिंकवर खड्डे पडलेत, कनेक्टरजवळ दोन खड्डे पडलेत, बाकी कुठेही खड्डे नाहीत. मात्र काही लोकांना आनंद आहे की, कुठल्याही गोष्टीला खूप मोठं करायचं. कुठलंही काम झाल्यावर आणि पहिला पाऊस झाल्यावर दुसरी लेयर येते. त्या पावसामध्ये रस्त्याची टिकण्याची क्षमता टेस्ट करण्यात येते आणि काय अडचणी येतील, ते टेस्ट करत असतो. परिणामी, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ त्यामुळे हरकत नाही, एमएसआरडीसी योग्य काळजी घेईल.  नवीन उड्डाणपुल केल्यावर त्याठिकाणी मास्टिक एस्फाल्ट सुरुवातीला जमा होते. त्यानंतर योग्य पद्दतीने चालते. केलेलं काम सेटल करावे लागते, या इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. कुठे काही कमतरता असतील तर दूर करता येतील. पण देशातील सर्वात उंच पूल, देशातील सर्वात रुंद बोगदे, डॅमच्या खाली बोगदा हे पहिल्यांदा आपण करुन दाखवलंय. त्यामुळे निव्वळ टीका करणं योग्य नाही,” असे त्यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा 

Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *