याच विकासामुळे राज्याचे एक उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटल.. संजय राऊतांची शिंदेंवर खोचक टीका, थेट.. – Marathi News | Sanjay Raut has strongly criticized Eknath Shinde along with the BJP


शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार आणि 1 आमदार फुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. उद्धव ठाकरे यांनी येत्या मंगळवारी मातोश्रीवर आमदारांची बैठक ठेवली. काल दादर येथील हनुमान मंदिराजवळ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन पार पडले. अयोध्येतील राम मंदिरातील चोरी विरोधात हे आंदोलन होते. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेते उपस्थित होते. नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, आज आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोड घालून बघायला फिरावे. विकासाचा फार गाजावाजा केला जातो. पण विकासाच्या नावाखाली दलाली किती टोकाला गेली हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचे असेल तर त्यांनी मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पाहावी. मला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आश्चर्य वाटते की, शिकलेला माणूस आहे. मिसिंग लिंकवर म्हणतात की, दोन खड्डे पडले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज जाऊन पाहावे, काय अवस्था आहे. मिसिंग लिंक कोसळला आहे. खड्डे सोडून द्या… अख्खा मिसिंग लिंक कोसळला आहे. याच कारण भ्रष्टाचार आणि दलाली आहे. आपलं कोण काय वाकडं करणार. आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30-35 टक्के अगोदरच घेतले आहेत. आपआपल्या ठेकेदारांना कामे दिली आहेत. आता तुम्ही जाऊन विकास पाहा. एवढ्या विकास झाला आहे की, त्या धक्क्याने उपमुख्यमंत्री आजारी पडले आहेत.

म्हणजे त्यांना विकासाचे इतके अर्जिण झाले आहे. याच विकासामुळे राज्याचे एक उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. काल 6 माणसे मेली. त्या मुंबईच्या महापाैर दिवसभर फिरत असतात, फोटो काढत. तिथे माणसे मेली आणि या तिथे एका बिल्डरच्या घरी बारशाला होत्या. लोकांचा आक्रोश चालू आहे तिकडे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष तिकडे खिदी खिदी हसत आहेत.

या मुंबईवर आणि महाराष्ट्रावर दुर्योधनाचे राज्य आले आहे. अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस आणि मिंधे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवली. तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याचे काही कारणच नाहीये. त्यांना काही कळतच नाही काय चालंल ते.. हिंदुंची मंदिरे मोगलांनी लुटली, असे इतिहासामध्ये आहे. भारतीय जनता पक्षाने आम्ही मंदिरांचे कसे संरक्षक आहोत, हे दाखवून मते मिळवली. पण आता ज्या प्रकारे मंदिरे लुटली जात आहेत. राम मंदिर असेल केदारनाथ बद्रीनाथ असेल या सगळ्या मंदिरांचे जे चोर आहेत ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत.

पुढे राऊतांनी म्हटले की, *गेले साडेचार वर्ष मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. साडेचार वर्षात आपण काय केलं हे मुंबईत दिसत आहे मिठी नदीमध्ये देशात आहे मिठी नदीचा घोटाळा सुरू आहे त्याचे लाभार्थी कोण आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे ठेकेदार आहेत त्याच्यामध्ये गौतम अडाणी यांना सुद्धा मोठ् काम मिळालं.

25 वर्षाचा सोडा आता साडेचार वर्षाचा बोला 70 वर्ष काँग्रेस सतत होती अरे नालायकांनो बारा वर्षे तुम्ही आहात ना बारा वर्षे कमी झाली. ना बारा दिवस सुद्धा पुरे पडतात चार दिवस सुद्धा पुरे असतात आमचं काय काढतो साला साडेचार वर्ष चाटतो का जाऊन तिकडे अखी महापालिका साडेचार वर्षात लुटली ठेकेदारांच्या राज्य महापालिकेत आणलं पहा मुंबईचे काय दैना करून ठेवली आहे जाऊन पहा मिसिंग लिंक ची काय दैना करून ठेवली आहे मुंबई चे रस्ते कसे वाहून गेले आहेत.

3000 कोटीचा पुतळा सरदार वल्लभाई पटेल यांचा कुठे बसवला. गुजरातला चीन वृत्तपत्रात आज बातमी आली आहे. त्या पुतळ्याचे खरी किंमत साडेतीनशे कोटी रुपये आहे. मग हे वरचे पैसे साधारण अडीच हजार कोटीच्या खाली कोणी खाल्ले साडेतीनशे कोटीच्या पुतळा 3000 कोटीला दाखवला गुजराती ठेकेदार व्यापारी सरदार पटेल यांना सोडत नाही प्रभू श्रीरामाला सोडत नाही सीतामाईला सोडत नाही.

जबाबदारी कोणाची आहे. ज्यांचे राज्य आहे, भारतीय जनता पक्षातील त्यांच्या आहे त्यांनी महापौर असतील किंवा इतर पदाधिकारी असतील जे महापालिकेत पैसे गोळा करत आहेत. हे त्यांचे जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांचे बळी कशाकरता देत आहात, असेही संजय राऊत यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *