Mumbai Rain News: राज्यभरात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain News) बरसत आहे. पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी रस्ते खचलेत. तर काही ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. तर रायगड जिल्ह्यात काल पासूनची पुर परिस्थिती कायम आहे. सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा या नद्या धोकादायक परिस्थितीत वाहत असून महाड, रोहा, नागोठणे, पेण, खोपोली शहरात होते रात्रभर पुराचे पाणी साचलेले होते. काही प्रमाणात पाण्याची पातळी कमी झाली असली तरी आज रायगड जलमय झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर मुंबईत देखील मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तर अनेक महामार्गावर दरड कोसळण्याच्या आणि पुलावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. अशातच आता हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना आणि अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्ष्यात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Rain Updates)
महत्त्वाची सूचना
⛈️🚨भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (State Disaster Management…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2026
खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे- (Mumbai Rain News)
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (Work From Home) निर्देशित केले आहे. तसेच, शासकीय/ निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाच्या सूचना- (Mumbai Rain Marathi News)
- भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे.
- नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.
- तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अहोरात्र कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.
मुंबईत मुसळधार पाऊस, VIDEO:
संबंधित बातमी: