Mumbai Pune Expressway Rain News: पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प (Mumbai Pune Expressway Rain News) आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावर ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे. (Mumbai Pune Route Latest News)
दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. लोणावळ्याजवळ दरड कोसळल्यामुळं मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प असून आतापर्यंत 16 गाड्या रद्द तर सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. (Mumbai Pune Expressway Rain News)
जुन्या पुणे-मुंबई महार्गावरही दरड कोसळलेली- (Mumbai Pune Old Highway)
पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. दरम्यान दरड कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावरही दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आह. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय. दरम्यान दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली- (Maharashtra Rain Updates)
राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी रस्ते खचलेत. तर काही ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. तर रायगड जिल्ह्यात काल पासूनची पुर परिस्थिती कायम आहे. सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा या नद्या धोकादायक परिस्थितीत वाहत असून महाड, रोहा, नागोठणे, पेण, खोपोली शहरात होते रात्रभर पुराचे पाणी साचलेले होते. काही प्रमाणात पाण्याची पातळी कमी झाली असली तरी आज रायगड जलमय झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील कोणकोणते रस्ते बंद? (Maharashtra Rain Marathi News)
- मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे बंद
- मुंबई – पुणे जुना हायवे बंद
- मुंबई – गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद
- रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद
- रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद
- रायगड – माणगाव-पाली मार्ग बंद
- रायगड – माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद
मुंबई-पुणे महागार्गासह लोहमार्गही बंद, VIDEO:
संबंधित बातमी: