Dhiraj Lingade on Sanjay Raut Claim: महाविकास आघाडीला आणखी एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून त्याला पक्षांतरासाठी 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊत यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचे विधानपरिषदेतील (Vidhan Parishad) पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे (MLA Dhiraj Lingade) यांच्याबाबत हे वक्तव्य केले होते. राऊतांच्या (Sanjay Raut) या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार धीरज लिंगाडे यांनी तातडीने प्रसारमाध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे. (Maharashtra Politics news)
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मलाही आज सकाळी कळालं, मला प्रसारमाध्यमांनी सांगितले. संजय राऊत महाविकास आघाडीचे (MVA) नेते आहेत, त्यांनी एकदम असं वक्तव्य कसं केलं, याचं मला आश्चर्य वाटलं. परंतु, हे साफ खोटं आहे, अशी कुठलीही ऑफर मला नाही, माझ्या संदर्भात केलेला दावा खोटा आहे, असे धीरज लिंगाडे यांनी निक्षून सांगितले. मला कोणत्याही राजकीय पक्षाकडून कुठलीही ऑफर मला आली नाही व मी कुठल्याही रुग्णालयात भरती झालेलो नाही, असेही त्यांनी म्हटले.
Sanjay Raut: संजय राऊतांनी नेमका काय दावा केला?
माझ्या कानावर आले आहे की, लिंगाडे नावाचे आमदार आहेत त्यांना 20 कोटी रुपयांची ऑफर आली आहे. काल परवाची गोष्ट आहे. या आमदाराला ऑफर देण्यात आली आहे. तो आमचा आमदार नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, चर्चा सुरु असतात, अमुक माणसाला ऑफर देण्यात आली आहे. त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.
Maharashtra Politics: संजय राऊतांच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी पदवीधरचे आमदार लिंगाडे यांना महायुतीकडून 20 कोटीची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर भाजप आमदार पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल संजय राऊत यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यांच्या याच वक्तव्यांमुळे त्यांच्या पक्षातील लोक त्यांना सोडून जात आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर