Shreyas Iyer News : आयपीएलमध्ये लखनौचा पराभव करत पंजाबने आपले आव्हान प्ले ऑफमध्ये कायम ठेवले आहे. या सामन्यात शतक ठोकत संघाला विजय मिळवून देणाऱ्या कॅप्टन श्रेयस अय्यरने विजयाचे श्रेय संघातील खेळाडूंना दिले आहे. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएल २०२६ मधील लखनौ आणि पंजाबमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पंजाबने विजय मिळवला आहे. आजचा सामना करो या मरो असा होता. कारण लखनौला पराभूत करण्यात पंजाब अपयशी ठरले असते तर ते बाहेर गेले असते. मात्र आता विजय मिळवला असता तरी त्यांच्यासाठी रस्ता मोकळा झाला असे नाही. कारण मुंबई आणि राजस्थान या सामन्याच्या निकालावर पंजाबचे स्थान अवलंबून असणार आहे. लखनौच्या १९७ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने १०१ धावांची नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र पठ्याने सामना संपल्यावर स्वत:ला क्रेडिट न घेता. मोठ्या मनाने विजयाचे श्रेय इतर खेळाडूंना दिले. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.
श्रेयस अय्यर काय म्हणाला ?
मी खूप आनंदी आहे कारण एकदम योग्यवेळी माझं पहिलं शतक आलं. कारण सलग सहा पराभव झालेले आणि विजय मिळवणं महत्त्वाचं होतं आणि तो आम्ही मिळवला. खास करून गोलंदाजांचं कौतुक, कारण पहिल्या ओव्हरमध्ये १६ धावा गेल्या होत्या तरी अझमत याने दमदार गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेऊन धावा रोखल्या. ४ ओव्हरमध्ये २३-२६ धावा दिल्या हा महत्त्वाचा मोमेंट असतो. युजवेंद्र चहल यानेही आज त्याचा दम दाखवला, मागील सामन्यामध्ये त्याने अधिक धावा दिल्या होत्या पण पंतची विकेट घेत धावा रोखल्या, असं श्रेयर अय्यरने सांगितलं. LSG vs PBKS : श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीने पंजाबचा दिमाखदार विजय, क्वालिफायचा टॅग नाहीच; मुंबई इंडियन्स ठरणार किंगमेकर आज मला मैदानावर वेळ घालवणं महत्त्वाचं होतं त्यामुळे जबरदस्ती न करता टायमिंग करून खेळलो. प्रभसिमरन याने आज ज्या प्रकारे गोलंदाजांवर आक्रमण केले ते पाहून मजा आली. आज त्याने त्याची ताकद दाखवली. आमची भागीदारी निर्णायक ठरली. शतक करून सामना संपवणं हे प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. आज मी रिकीला सांगितलं की टीम मीटिंग नको, आपला रोजचाच सराव करायचा. निकाल काय लागला ते दिसतंच आहे, असं श्रेयस अय्यर म्हणाला. LSG vs PBKS : तेंडुलकर इज बॅक! पंजाबविरूद्ध सामन्यात लखनौने अर्जुनला उतरवलं, 735 दिवसांनंतर खेळणार IPL दरम्यान, या सामन्यामध्ये लखनौ संघाने अर्जुन तेंडुलकर याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली होती. अर्जुननेही मिळालेल्या संधीचे सोने केले. ४ ओव्हरमध्ये ३६ धावा देत १ विकेट घेतली. प्रभसिमरन सिंग याची विकेट घेत सामना आणखी लांबवला. लखनौचा तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा