Kabir Bedi : सुप्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीमध्ये राजीव गांधी यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीमध्ये गांधी कुटुंबासोबतच्या आपल्या संबंधांबद्दल भाष्य केलं असून माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्यासोबत घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर बेदी यांनी खुलासा केला की, ते आता राजकीयदृष्ट्या काँग्रेस पक्षामध्ये नसले तरी, बालपणी गांधी कुटुंबासोबत त्यांच्या कुटुंबाचे खूप चांगले संबंध होते. या संभाषणादरम्यान, कबीर बेदी यांनी आपल्या सध्याच्या राजकारणाबद्दल बोलताना म्हणाले की, त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. कबीर बेदी म्हणाले, ‘आजकाल मी काँग्रेस पक्षात अजिबात नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे.’ Sandeep Pathak Exclusive : ‘लोक माझ्या दातांवर पंचेस मारायचे, मग मीच त्यावरून फिरकी घ्यायला लागलो’ संदीप पाठकनं सांगितला किस्सा
कबीर बेदींनी सांगितली राजीव गांधींची आठवण
आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना कबीर बेदी यांनी सांगितलं की, ते राजीव आणि संजय गांधी यांच्यासोबत एकाच शाळेत शिकले होते. ‘राजीव माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे होते आणि संजय एक वर्षाने लहान होते. आम्ही हेली रोडवरील एका छोट्या शाळेत एकत्र शिकलो.’ असं कबीर बेदी यांनी सांगितलं. Arya Babbar : ‘पैशांसाठी वडील पाहिजे असतात, पण मानसन्मान देण्याची वेळ येते तेव्हा वडील नको’ प्रतीक स्मिता पाटीलवर आर्य बब्बरचा संताप कबीर बेदी यांनी पुढे सांगितलं की, गांधीजींच्या घराशेजारी मोठे लॉन होतं, जिथे प्रशिक्षणासाठी घोडे आणले जायचे आणि तिथेच ते घोडेस्वारी शिकले. ‘घोडेस्वारीत पारंगत असल्यामुळे मला ‘कच्चे धागे’ आणि ‘संदोकन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम मिळण्यास मदत झाली.’ असंही कबीर यांनी सांगितलं. Tharala Tar Mag : चोराच्या उलट्या बोंबा! लफडी करूनही सचिनचं अस्मिताला ओपन चॅलेंज, छुप्या कॅमेराच्या मदतीनं साधला नवा डाव राजीव गांधींच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त करत कबीर बेदी म्हणाले की, ‘त्यांची हत्या ही सर्वात मोठी वाईट घटना होती. राजीव मनाने खूप चांगले माणूस होते.’ संजय गांधींबद्दल बोलताना कबीर बेदी पुढे म्हणाले की, ‘भारतासाठी एक कार बनवण्याचं संजय यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अखेरीस मारुती सुझुकी करारामुळे पूर्ण झाले.’
राजीव गांधींचे मारेकरी सोडून देण्यात येत असल्याचं पाहून दुःख होतं: राहुल
दरम्यान, कबीर बेदी यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘खून भरी मांग’, ‘नागिन’, ‘यालगार’, ‘किस्मत’, ‘हलचल’, ‘कुर्बान’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा