MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!


MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी (Jain Community White Line Controversy Mumbai) रंगवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील दादर पच्छिममधील डीएस बाबरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पांढऱ्या पट्ट्यांवरुन आक्षेप घेतला आहे. बाबरेकर मार्गावर असलेल्या जैन मंदिराच्या बाजूच्या लेनमध्ये हा पट्टा मारण्यात आला आहे. लेनच्या सुरुवातीपासून ते गोकुळ धामच्या इमारतीपर्यंत हा पट्टा मारण्यात आला आहे. 

महापालिकेकडून तात्काळ रस्त्यांवरील पांढरे पट्टे हटवण्याचे काम हाती- (Jain Community White Line Controversy Mumbai Road)

पांढऱ्या पट्ट्यांवरुन संदीप देशपांडेंनी इशारा दिला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत दादरमधील पांढरे पट्टे हटवण्यात यावे…अन्यथा आम्ही पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारु, असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला. संदीप देशपांडेंच्या या इशाऱ्यानंतर महापालिकेकडून तात्काळ रस्त्यांवरील पांढरे पट्टे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिकेचे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले आणि लगेच पांढऱ्या पट्टीचा रंग काढण्याचे काम हाती घेतले. 

नेमकं प्रकरण काय? (White Line Controversy In Mumbai)

सोशल मीडियावर गेल्या आठवडारापासून युट्यूबर प्रसाद वेदपाठकने (Prasad vedpathak) उचलून धरलेला वादाचा मुद्दा चांगलाच गाजत असून घाटकोपरमधल्या (Mumbai) सोसायटीचा हा वाद आहे. सोशल मीडियावर या वादावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. आपण राहत असलेल्या सोसायटीतील घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केलीय, त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण, सोसायटीमधील जैन कुटुंबीयांनी सोसायटीत कुणालाही न विचारता पांढरी पट्टी मारली होती. या पांढऱ्या पट्टीला सोयायटीमधील इतर सदस्यांनीही विरोध दर्शवला होता. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर, आता ह्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करण्यात आलं असून स्वत: प्रसादने याची माहिती दिली आहे. 

प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रसादने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी सोसायटीतील सदस्यांची परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. प्रसादच्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही त्याने केली होती. अखेर, प्रसादने ट्विटवरुन घटनेची माहिती देत, पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम सुरू करण्यात आल्याचे सांगितले, त्याने फोटोही शेअर केला आहे. तसेच, माध्यमांनी दखल घेतल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

दादरमध्ये राडा, मनसे आक्रमक, नेमकं काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *