Ladaki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची नेमकी संख्या किती? आदिती तटकरेंनी आकडेवारी सांगितली, बीडच्या लाभार्थी संख्येवर स्पष्टीकरण


Ladki Bahin Yojana News मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील  3,542 कोटी रुपयांच्या खर्चासंदर्भात कॅगनं ताशेरे मारल्याचं समोर आलं आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळल्याची चर्चा  सुरु झाली होती. बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या संख्येसंदर्भातील आकडेवारीवरुन संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व घडामोडींवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची आकडेवारी देखील आदिती तटकरे यांनी सांगितली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

लाडकी बहीणची ई केवायसी प्रक्रिया ऑगस्ट 2025 पासून सुरु केली होती, ई केवायसीसाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. ई केवायसीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी एप्रिलपर्यंत मदत देण्यात आली होती. ई केवायसी न केलेल्या महिलांची संख्या 60 लाख आहे. आयकर विभागाचा डेटा आहे त्यात 5 लाखांचा डेटा आहे. पतीचं किंवा घरातल्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे,त्यांची संख्या 14-15 लाखांचा डेटा आहे. तर, वाहन नावावर असल्यानं अपात्र ठरलेल्यांचा डेटा साडे चार पाच लाखांचा डेटा आहे. वारंवार संधी देऊनही काही महिलांनी ई केवायसी केलेली नाही. ई केवायसी करणाऱ्या महिलांना लाभ मिळत नाही, अशा काही तक्रारी किंवा निवेदनं मिळाली होती, त्याची पडताळणी सुरु आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यात लाभार्थी किती?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी प्रक्रिया पार पाडल्यानंतर 1 कोटी 67 लाख महिला या पात्र झाल्या आहेत. बीड जिल्ह्याबाबत जे सांगितलं आहे ते चुकीचं आहे. बीड जिल्ह्याची लोकसंख्या 32 लाख आहे मग 28 लाख लाभार्थी अपात्र कसे काय असतील? यासंदर्भाती जो डेटा आहे त्यात काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यातील नोंदणी साडे सहा लाख महिलांची संख्या होती. त्यातील पात्र महिलांची संख्या चार ते साडे चार लाख असून त्यांना लाभ सुरु आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मूळ नोंदणी 2 कोटी 63 लाख होती. सुरुवातीला पात्र महिलांची संख्या 2 कोटी 43 लाख  आणि 2 कोटी 47 लाख होता. ती आकडेवारी विचारात घेतली असता 92 लाखांची संख्या येते. मात्र, लाडकी बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण केल्यानंतर पात्र महिलांची संख्या 1 कोटी 67 लाख ते 1 कोटी 70 लाखांची आकडेवारी आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.  शेवटचा हप्ता दिला होता त्यातील डीबीटी संख्या 1 कोटी 67 लाख इतकी असल्याचं तटकरेंनी म्हटलं. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *