डॉलीने सांगितलं की तिचे वडिल आईला मारहाण करायचे. मला आणि माझ्या बहिणींना अजिबात मान नव्हता. शो मध्ये कुशल टंडनचं खराब व्यवहार तिला वडिलांच्या खराब वर्तनाची आठवण करुन द्यायचा. आम्हा पाच बहिण-भावंडांमध्ये आईने खूप बलिदान दिलय. वडिल जेव्हा आईसोबत भांडणं करायचे, तेव्हा मी बेड खाली लपून बसायचे.
शो मधून निघण्यापूर्वी नीति टेलर सोबत बोलताना डॉली जावेद म्हणाली की, माझे वडिल मला, माझ्या बहिणींना आणि आईला वेश्या म्हणायचे. वेश्या हा शब्द तर काहीच नाही. माझे वडिल आमच्याबद्दल इतकं घाणेरडे बोललेत की, मी ते सांगूही शकत नाही. आम्हाला खूप राग यायचा. पण वडिल होते, म्हणून बोलूही शकत नव्हतो.
माझे वडिल सर्वांना जाऊन सांगायचे की आम्ही वेश्या आहोत. माझ्या वडिलांमुळे सर्व नातेवाईक, गावात पसरलेलं की आम्ही घाण काम करतो. म्हणून ते आम्हाला सोडून जातायत आणि आईला घटस्फोट देतायत.
डॉली म्हणाली की, मी माझ्या वडिलांचा द्वेष करायची. वडिलांनी माझ्या आईला सोडल्यानंतर त्यांनी अजून दोन-तीन लग्न केली. वडिलांनी कमीत कमी तीन-चार लग्न केलीत.
वडिलांबद्दल बोलताना डॉलीने शो मध्ये हे सुद्धा सांगितलं की, माझ्या वडिलांनी मला मानसिक दृष्ट्या खूप त्रास दिला. आम्हाला ते खूप शिवीगाळ करायचे. मी पाचव्या इयत्तेत होते, तेव्हापासून ते आम्हाला सोडून घरापासून लांब रहायचे.




