Ram Kapoor in lock up 2: ‘ब्लँकेटच्या आत त्याने मला…’ बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? ‘लॉक अप 2’मध्ये केला खुलासा


Ram Kapoor in Lock Up Season 2: ‘लॉक अप 2’मध्ये (Lock up) सध्या राम कपूरची बरीच चर्चा रंगली.  या शोमधून त्याने अनेक खुलासे केले.  त्याने या शोमधून आणखी एक खुलासा केला आहे, ज्यामुळे अनेकांना धक्काच बसला.  राम अवघ्या (Ram Kapoor) 13 वर्षांचा असताना  आणि बोर्डिंग स्कूलमध्ये (Boarding School) शिकत असताना त्याचा लैंगिक छळ झाला होता.  त्याने या शोमध्ये सांगितलं की, ही गोष्ट लपवून ठेवली होती. राम कपूरची बायको गौतमी कपूरलाच याची माहिती होती. दरम्यान, ही बाब उघड होताच सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना मोठा (Entertainment) धक्का बसला.  यावेळी अनेकांनी त्याच्या प्रामाणिकबद्दल आणि धैर्याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, राम कपूरने ही गोष्ट उघड करताच, जेनेलिया देशमुख हिला रडू अनावर झालं.

राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? (lOCKUPP 2 ram Kapoor on boarding school days)

राम कपूर ही गोष्ट सांगताना भावुक झाला होता.  ‘बोर्डिंग स्कूलमध्ये माझ्यासोबत विनयभंग झाला होता. मी 8वीत शिकत होतो. मी साधारण 13 वर्षांचा असेन. शालेय दिवसांत आम्ही दिवस संपल्यानंतर   एकमेकांच्या बेडवर बसून गप्पा मारायचो. आम्हाला तेव्हा मज्जा यायची’, असं राम कपूर म्हणाला. ‘मग त्यावेळी दहावीतला एक विद्यार्थी माझ्या बेडवर येऊन बसला. आम्ही तेव्हा एकमेकांची मस्करी करत होतो. ब्लँकेटच्या आत त्याने मला स्पर्श केला’, असं राम कपूर म्हणाला.

‘त्यावेळेस आजूबाजूला साधारण 30-40 मुले होती.  त्यावेळी मला काय करावं सुचलं नाही, मी स्तब्ध झालो. मी काहीही करु शकलो नाही. तो असं करत राहिला आणि मला कळालं नाही की, मी काय रिअॅक्ट करु.’, असं म्हणत राम कपूर भावुक झाला. ‘त्या घटनेनंतर मी बदललो. शांत झालो.  त्यानंतर तो मुलगा माझ्या जवळ आला आणि त्याने माझी माफी मागितली. त्या व्यक्तीने मला मानसिक धक्का दिला होता. पण त्यानेच या धक्क्यातून बाहेर काढण्यास मदत केली. आम्ही चांगले मित्र झालो’, असं राम कपूर म्हणाला.

यावेळी जेनेलिया देखील भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं. तिनं याबाबत पोस्ट शेअर केली, पोस्टमध्ये तिनं म्हटलं की, ‘राम कपूर तुम्ही मला रडवले. आपण ज्या जगात राहत आहोत, त्या जगाकडे पाहण्याचा हृष्टिकोन बदलला आहे’, असं तिनं म्हटलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *