7596951951.16 रुपये शिल्लक, पेन्शनचे 1100 रुपये काढणाऱ्या आजोबांचं खातं पाहून सगळेच हैराण | व्हायरल न्यूज (Viral News in Marathi)


Last Updated:

मिश्र यांच्या खात्यामध्ये तब्बल   7596951951.16 रुपये म्हणजे, ७५९ कोटी रुपये शिल्लक असल्याचं दिसलं. 

News18
News18

“ऊपरवाला देता है, तो छप्पर फाड़कर देता है” असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं, कारण, एखाद्याचं नशीब पालटलं तर भरभरून मिळत असतं. अशीच एक घटना समोर आली असून यामध्ये एका वृद्धा व्यक्ती तब्बल ७५९ कोटी रुपये खात्यात आले. खरंतर ही व्यक्ती पेन्शनचे ११०० रुपये काढण्यासाठी गेली होती, पण, इतक्या मोठी रक्कम पाहून आजोबांचा आनंद गगणात मावेना असा झाला.

त्याचं झालं असं की, कामेश्वर मिश्र (वय ८२) हे बिहारमधील मुज मुजफ्फरपूर येथील सकरा इथं थतिया सीहो गावात राहणारे आहे. कामेश्वर मिश्र हे पेशाने कवी आहे. कामेश्वर मिक्ष हे ग्राहक सेवा केंद्रावर ११०० रुपये पेन्शनचे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी  बँक ग्राहक सेवा केंद्र (CSP) संचालकाने जेव्हा खातं तपासलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. मिश्र यांच्या खात्यामध्ये तब्बल   7596951951.16 रुपये म्हणजे, ७५९ कोटी रुपये शिल्लक असल्याचं दिसलं.

केंद्र सरकारकडून मिळणारी वृद्ध सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत ११०० रुपये मिळणाऱ्या आजोबांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम पाहून ग्राहक सेवा केंद्रावरील कर्मचाऱ्याचे डोळे पांढरे झाले. कामेश्वर मिश्र यांना सांगितलं तेव्हा त्यांनाही याच्यावर विश्वास बसेना. आपल्या खात्यात ७५९ कोटी रुपये आहे, हे ऐकून मिश्र हैराण झाले. मिश्र यांच्या खात्यात इतके पैसे असल्याची बातमी गावात वाऱ्या सारखी पसरली.

पैसे काढण्याचा केला प्रयत्न आणि अकाऊंट शून्य

११०० रुपये पेन्शनचे काढले त्यानंतर हा प्रकार घडला होता. आता खात्यात इतके पैसे आले तर काढून बघायला काय हरकत म्हणून, ग्राहक सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्याने प्रयत्नही केला. काही पैसे काढण्यासाठी प्रोसेस केलं पण, सिस्टिममध्ये एरर आला. त्यामुळे पैसे काही निघाले नाही. पुन्हा १० मिनिटांनी हा प्रयत्न करण्यात आला, पण, तेव्हाही सिस्टिममध्ये एरर आला आणि पैसे काही निघाले नाही. १० मिनिटांनी जेव्हा अकाऊंट पुन्हा तपासले तेव्हा   7596951951.16 रुपये गायब झाले. खात्यात शुन्य पैसे बाकी होते. हे पाहून ग्राहक सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्याला आणखी एक धक्का बसला. आता आपल्या खात्यात काही नाही हे पाहून मिश्र आता नाराज झाले, जे ११०० रुपये पेन्शनचे आले होते, ते घेऊन घरी चालले गेले.

जितके आहे तितके पुरे

पण, १० मिनिटांसाठी मिश्र आजोबा हे त्या गावातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. पण, आपण गरीब आहोत, बँकेकडून चुकून इतके पैसे खात्यात आले असतील, अशी स्वत: ची समजूत काढत कामेश्वर मिश्र यांनी आपल्याकडे जितके पैसे आहे, त्यावर समाधान मानत ग्राहक केंद्रावरून घरी निघाले. पण, १५ मिनिटांमध्ये घडलेल्या या घटनेमुळे कामेश्वर मिश्र आजोबा आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

मराठी बातम्या/Viral/

 7596951951.16 रुपये शिल्लक, पेन्शनचे 1100 रुपये काढणाऱ्या आजोबांचं खातं पाहून सगळेच हैराण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *