Ketan Agrawal Case : ‘मी श्रीमंत आहे, पळण्याचा विचार जरी केलास तर…’, केतन सतत का द्यायचा सियाला धमकी? – Marathi News | Ketan Agrawal use to Threat siya goel what is the truth police new update on murder case


Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता नवीन अपडेट येत आहेत. सियाने होणाऱ्या 26 वर्षीय नवऱ्याला पुणे येथील लोहगड किल्ल्यावरुन ढकललं आणि यामध्ये केतन याचं निधन झालं. दरम्यान, समोर येत असलेल्या माहितीनुसार, केतन सतत धमकावत असल्याचा दावा सिया गोयल हिने केला आहे… सिया हिने केलेल्या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. सिने हिने केलेल्या दाव्यानुसार, तिने केतन याला सांगितलं होतं की, तिला लग्न करायचं नाही. पण केतन याने लग्न मोडण्यास नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, केतन याला सांगितलं होतं, मला तु्झ्यासोबत लग्न करायचं नाही. तेव्हा केतन याने लग्न मोडण्यास स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला, ‘आता फार उशीर झाला आहे. गोष्ट फार पुढे गेली आहे. हे लग्न मोडणं शक्य नाही.’

रिपोर्टनुसार, सिया हिने असा देखील दावा केला आहे की, केतनने तिला धमकावलं होतं. ‘माझं कुटुंब प्रचंड प्रभावशाली आणि श्रीमंत आहे. तू पळण्याचा विचार किंवा प्रयत्न जरी केलास, तरीही वाचू शकणार नाहीस…’, सिया हिच्या अशा दाव्यामुळे प्रकरणाला एक वेगळा ट्विस्ट आहे…

मोबाईल फोन्सवरून चॅट समोर

पोलिसांनी सिया आणि केतन यांच्या मोबाईल फोन्सवरून चॅट हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या चॅटवरुन असं दिसून येत आहे की, सियाचा हा दावा खोटा ठरतो की तिने केतनशी लग्न न करण्याची इच्छा व्यक्त केली होती; त्याऐवजी, या चॅटवरुन लग्न करू पाहणाऱ्या जोडप्यांमधील स्वाभाविक आणि प्रेमळ नातं दिसून येतं. मिळाल्या माहितीनुसार, केतन याचं टक्कल असून तो विग वापरतो, पण सिया हिला टक्कल असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करायचं नव्हतं… एवढंच नाही तर, केतन अडखळून बोलायचा, ही गोष्ट देखील सिया हिला खटकत होती.

नोव्हेंबर महिन्यात होणार होतं लग्न

सिया गोयल हिचा रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल याच्याशी फेब्रुवारी महिन्यात एका भव्य समारंभात साखरपुडा झाला. या नोव्हेंबरमध्ये राजस्थानमध्ये एका शानदार विवाहसोहळ्यात ते विवाहबंधनात अडकणार होते. लग्नापूर्वी सिया आणि केतन यांच्यातील आनंदी आणि सुंदर प्रेमाची झलक दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

पण सोशल मीडियावर जे दिसत होतं, ते वास्तव नव्हतं. सिया हिचं चेतन चौधरी या मुलावर प्रेम होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याच्यासोबत असणारे सर्व संबंध सियाला मोडायचे होते. पण कुटुंबियांच्या विरोधाची भीती होती. सिया आणि चेतन यांनी मिळून केतन याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेलं आणि तिथे त्याला सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलून दिले. पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *