IND vs IRE: सलग दोनदा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाला पाणी पाजल्यानंतर आयर्लंड कर्णधार काय म्हणाला? प्रतिक्रियेची जोरदार चर्चा – Marathi News | Ireland captain Lorcan Tucker on ireland win against team india 1st t20


भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना पार पडला. या मालिकेत दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना काल पार पाडला जो आयर्लंड संघाने जिंकला. आयर्लंड संघाने भारतीय संघाला 34 धावांनी पराभवाचा धक्का दिला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिलाच सामना गमावला. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंड संघाने 182 धावा केल्या. भारतीय संघाना 148 धावा करता आल्या. एकट्या अभिषेक शर्माने अर्धशतक खेळी खेळली. भारतीय संघाला धुळ चारल्यानंतर आता आयर्लंड कर्णधाराने प्रतिक्रियेत काय सांगितले ते जाणून घ्या…

आयर्लंडच्या पहिल्या डावात, टकरने अर्धशतक झळकावून आपल्या संघाला 182 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, टीम इंडियाची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये त्यांनी तीन विकेट गमावल्या. भारताला त्याचे परिणाम भोगावे लागले आणि आयर्लंडच्या संघाने पाहुण्या संघाचा 34 धावांनी पराभव केला. यासह, आयर्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

भारतीय संघाविरुद्ध विजयानंतर आयर्लंड कर्णधार म्हणाला की,”आम्ही जिंकलो तो क्षण खरोखरच खास होता. आम्ही कडवी झुंज दिली, काही कठीण क्षण आले, पण आम्ही आमचा संयम राखला आणि निष्ठेने खेळलो. मला वाटते की भारताने सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली.आमच्यासाठी चांगले फटके खेळणे कठीण होते. काही काळासाठी, हा एक कसोटी सामना असल्यासारखे वाटत होते. मला वाटते की विश्वविजेत्यांना आमच्या भूमीवर हरवणे खूप खास आहे. याचे श्रेय खेळाडूंना आणि क्रिकेट आयर्लंडच्या पडद्यामागील मेहनतीलाही जाते. मला वाटते की पदार्पण करणाऱ्यांनी मोठे धैर्य दाखवले. आम्ही भारताच्या गोलंदाजीतून शिकलो आणि त्यांनी सातत्याने योग्य ठिकाणी गोलंदाजी करण्याची उत्तम क्षमता दाखवली. भारताविरुद्धची मालिका आमच्याच भूमीवर जिंकणे खूप खास असेल.”

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अत्यंत लाजिरवाणी सुरुवात झाली आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये आयर्लंडविरुद्ध पराभव पत्करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, भारतीय संघाने केवळ टी-20 आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर एकदिवसीय सामन्यांमध्येही आयर्लंडविरुद्ध एकही सामना गमावला नव्हता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *